मुंबई : राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) सध्या परभणी दौऱ्यावर आहेत. परभणीच्या श्रीकृष्ण गार्डन येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांनी अरे ला कारे करा. कोणी एक मारली तर तुम्ही चार मारा. मी तुमच्या पाठीमागे आहे. काही काळजी करू नका. पण हे करताना कुणावर अति करू नका. अन् कुणाची अति सहनही करू नका, असं वादग्रस्त वक्तव्य केले आहे.
तसेच अब्दुल सत्तार यांनी यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची नक्कल करत त्यांची खिल्ली उडवली. यावेळी सत्तार म्हणाले की, हे घरी बसल्याने आता शिवसैनिकांवर आंदोलन करण्याची वेळ आली आहे. कारण यांनी मुख्यमंत्री असताना आपल्याच पक्षातील आमदार आणि कार्यकर्त्यांना काहीच दिलं नाही आण आता काय देणार? मी पण कार्यकर्ता आहे. मलाही सर्व कळतं. घरात बसून, पडद्याच्या आड बसून चालत नाही. तर सरदार शिवाजी महाराजांप्रमाणे सर्वात पुढे असावा लागतो, असा टोलाही त्यांनी लगावला.
यानंतर सत्तार म्हणाले की, पुढची सत्ता येण्याची स्वप्न कधी दहा जन्म बी पूर्ण होणार नाही, हे मी सांगतो, अस भाकीत सत्तारांनी वर्तवलं. मुख्यमंत्री शिंदे अठरा तास काम करत आहेत. पण विरोधक मुख्यमंत्री झोपतात कधी असं विचारत आहेत. विरोधकांनी ते झोपतात कधी पेक्षा ते काय करू लागले हे बघा.
समाजमाध्यमांवरील या व्हायरल संदेशाने घातली दहशत, मुले चोरणारी टोळी ठरली अफवा
कारण सामान्य कुटुंबातला ऑटो ड्रायव्हर आणि शेतकऱ्याचा पोरगा मुख्यमंत्री कसा होतोय ते पहा, कारण आतापर्यंत सोन्याच्या चमच्याने दूध पिणारेच लोक मुख्यमंत्री झालेत. हा पहिला मुख्यमंत्री आहे जो सामान्य कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेणारा. एकनाथ शिंदे हे गोरगरीब, कष्टकऱ्यांना सातत्याने मदत करत असतात, असंही त्यांनी सांगितलं.
Eknath Shinde: पुण्यातील ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणेवर एकनाथ शिंदेनी दिली प्रतिक्रिया म्हणाले…