राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे मोठे नेते आहेत. त्यांची विचारसरणी देखील जनतेला आवडते त्यामुळे शरद पवार हे पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील अशा चर्चा होत असतात. मात्र शरद पवार यांनी वेळोवेळी या चर्चांना थांबवत नकार दिला आहे. यामध्येच आता काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष, खासदार प्रफुल्ल पटेल यांनी एक मोठा दावा केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
बापरे! बदला घेण्यासाठी पत्नीने ओतले पतीच्या प्रायव्हेट पार्टवर उकळते तेल
प्रफुल्ल पटेल म्हणाले, “एच. डी. देवगौडा यांच्यानंतर आय. के. गुजराल नाहीतर शरद पवार देशाचे पंतप्रधान झाले असते,” असं ते म्हणाले आहेत. ‘एबीपी माझा’च्या ‘माझा कट्ट्या’वर ते बोलत होते.
बापरे! बदला घेण्यासाठी पत्नीने ओतले पतीच्या प्रायव्हेट पार्टवर उकळते तेल
त्याचबरोबर पुढे बोलताना प्रफुल्ल पटेल यांनी १९९६ सालच्या काही मोठ्या घडामोडी सांगितल्या आहेत. याबाबत बोलताना ते म्हणाले, “१९९६ साली देवगौडा यांचा पाठिंबा काँग्रेसच्यावतीने सीताराम केसरी यांनी काढून घेतला. त्यावेळी सर्व लोक शरद पवार यांच्या पाठीशी उभे होते. त्यावेळी जर शरद पवार ठाम राहिले असते, तर देवगौडा यांच्यानंतर आय. के. गुजराल नाहीतर शरद पवारच देशाचे पंतप्रधान झाले असते,” असे ते म्हणाले आहेत.