पारनेरचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) हे राष्ट्रवादी काँग्रेसमधील महत्त्वाचे नेते समजले जातात. अल्पावधीतच ते पवार कुटुंबियांच्या जवळचे झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये आल्यानंतरच निलेश लंके यांना आमदारकी मिळाली होती. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी चे सर्वेसर्वा शरद पवार नगर दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी त्यांनी पारनेर येथे निलेश लंके यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली.
मजुरी करणाऱ्या कुटुंबाला वीजबिलाचा आकडा पाहून बसला शॉक; घरात दोनच बल्ब पण 34 हजारचे आले बिल
दरम्यान निलेश लंके यांनी पवार कुटुंबावर आपले मत व्यक्त केले आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले की, “शरद पवार ( Sharad Pawar) हे परिस आहेत. पूर्वीच मी त्यांच्या संपर्कात आलो असतो, तर केव्हाच आमदार झालो असतो. पवार कुटुंबियांनी सांगितले तर मी कोरड्या विहिरीत सुद्धा उडी मारेल. त्यांनी मला आतापर्यंत भरभरुन प्रेम दिले आहे. पवार कुटुंबियांच्या सोबतीने मी लोकसभेच्या रिंगणात सुद्धा उतरु शकतो.”
तसेच शरद पवार, अजित पवार व सुप्रिया सुळे यांच्याबरोबर राहून आपण राजकारण करण्याची मर्यादा ठरवून घेतली आहे. आमदार झाल्यावर मी बदललो नाही आणि इथून पुढेही मी बदलणार नाही. असे आश्वासन यावेळी निलेश लंके यांनी दिले आहे. वागण्यात व राहण्यात साधेपणा असणारे नेते म्हणून निलेश लंके प्रसिद्ध आहेत.
“कोणतेच महापुरूष बॅचलर नाहीत”; चंद्रकांत पाटलांचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य