
मुंबई : सध्या राज्याच्या राजकारणामध्ये अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. शिंदें गटाच्या बंदमुळे शिवसेनेत पोकळी निर्माण झाल्याचे दिसत आहे. आदित्य ठाकरे कायम शिवसेनेची बाजू मांडताना दिसत आहेत. आदित्य ठाकरे सध्या अनेक दौरे करत आहेत. आता त्यांच्या या दौऱ्यावर मानसे नेते अमित ठाकरे यांनी टीका केली आहे. अमित ठाकरेंनी (Amit Thackeray) आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray) एक प्रश्न विचारला आहे. जर एकनाथ शिंदे यांचं बंड झालं नसतं तर तुम्ही दौरा केला असता का,? असा प्रश्न अमित ठाकरेंनी विचारला आहे.
तेजस ठाकरे (Tejas Thackeray) देखील आता राजकारणामध्ये प्रवेश करणार आहेत. अशा चर्चा सुरु आहेत. यावर अमित ठाकरे म्हणाले, तेजस ठाकरे राजकारणात येत असतील तर त्यांचं स्वागत आहे.
“आता येणारी प्रत्येक निवडणूक आपल्यासाठी महत्वाची आहे. येत्या निवडणुकांमध्ये प्रचार करण्यासाठी मी तयार आहे. कोणतीही निवडणूक असेल तरी मला बोलवा. आपण जोरदार प्रचार करू. आपल्या पक्षाने केलेलं काम आणि विचार घरोघरी पोचवण्याचा प्रयत्न करू. लोक नक्की आपल्यावर विश्वास ठेवतील आणि आपले लोक निवडूण येतील. आपल्याला प्रत्येक निवडणूक लढायची आणि जिंकायचीदेखील आहे. त्यामुळे मनसैनिकांनो, कामाला लागा”, असं अमित ठाकरे म्हणाले आहेत.