ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) कायम चर्चेत असतात. त्यांना पत्रचाळ घोटाळा प्रकरणी त्यांनी अटक करण्यात आली होती.अनेक दिवस तुरुंगात राहिल्यानंतर त्यांना मागच्या काही दिवसांपूर्वी जमीन मंजूर झाला आहे. आता राऊतांची सुरक्षा काढण्यात आली आहे. त्यामुळे राऊतांनी राज्य सरकारवर जहरी टीका केली आहे.
ब्रेकिंग! भगतसिंग कोश्यारींची राज्यपाल पदावरुन होणार हकालपट्टी?
संजय राऊत म्हणाले, “माझ्या जीवाला धोका आहे. हे सरकार माझ्या जीवाशी खेळतय. जर उद्या मला काही झालं तर त्याला हे सरकारच जबाबदार असेल, असा इशारा दिलाय. ते माध्यमांशी बोलत होते.
सरकारी नोकरीसाठी बंपर भरती सुरू; जाणून घ्या अधिकची माहिती
पुढे संजय राऊत म्हणाले, “मुंबईतील झालेल्या दंगलीपासून मला सुरक्षा व्यवस्था देण्यात आली होती. मागची २५ ते ३० वर्ष मला सुरक्षा देण्यात आली होती. पण आता सरकारने सुरक्षा काढून घेतली आहे. “आम्ही मागितली नाही आणि मागणारही नाही, असं देखील संजय राऊत म्हणाले आहेत.
Shrigonda: विसापूर फाट्यावजवळ भीषण अपघात; दोन जागीच ठार तर दोन जखमी