
Asia Cup 2023 । कोलंबो : सध्या आशिया कप स्पर्धेत (Asia Cup) सुपर-4 ची चुरस सुरु झालेली आहे. भारतासोबतच श्रीलंका, पाकिस्तान आणि बांगलादेशने सुपर-4 मध्ये दमदार एन्ट्री केली आहे. तर पहिल्याच सामन्यामध्ये पाकिस्तानने बांगलादेशचा पराभव केला आहे. सुपर 4 मधील दुसरा सामना उद्या खेळवला जाणार आहे. अंतिम सामन्यासह पाचही सामने श्रीलंकेतील कोलंबोत पार पडणार आहेत. (Latest Marathi News)
Buldhana News । दहीहंडीच्या उत्सवाला गालबोट; बुलढाण्यामध्ये चिमुकलीचा जागीच मृत्यू, नेमकं काय घडलं?
उद्या श्रीलंका विरुद्ध बांगलादेश सामना रंगणार आहे. यावेळी बांगलादेशला आव्हान कायम राखण्यासाठी हा सामना जिंकावाच लागेल. परंतु जर या सामन्यात पावसाने खोडा घातला तर चित्र बदलू शकते. कोलंबोमध्ये पुढील पाच दिवस मुसळधार पाऊस (Heavy Rain) पडण्याची शक्यता आहे. अशातच या स्पर्धेतील एकाही सामन्यासाठी राखीव दिवस ठेवला नाही. जर पावसामुळे अंतिम सामना रद्द झाला तर कोणता संघ विजयी होणार असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. (Asia Cup 2023 Final)
Havaman Andaj । राज्यात पावसाचे दमदार आगमन! ‘या’ जिल्ह्यात पडणार मुसळधार पाऊस
असे आहे गणित …
सध्या सुपर 4 राउंड सुरु असून प्रत्येकी टीम एकमेकांविरुद्ध प्रत्येकी 1 आणि एकूण 3 मॅच खेळतील. दोन्ही ग्रुपमधील अव्वल संघ फायनलसाठी क्वालिफाय केला जाईल. जर अंतिम सामना पावसामुळे रद्द झाला तर दोन्ही संघांना विजेता म्हणून घोषित केले जाणार आहे. त्याशिवाय विजेता संघांना ट्रॉफीही शेअर केली जाणार आहे. (Asia Cup Final)
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने दिली माहिती
या स्पर्धेचा अंतिम सामना 17 सप्टेंबरला होईल. परंतु दिवस राखीव नसल्याने पावसाळ्यामध्ये श्रीलंकेत सामने आयोजित करण्यावर प्रश्न निर्माण होत आहे. यापूर्वीच पावसामुळे मोठे नुकसान होईल अशी माहिती पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने दिली होती. त्यामुळे आता या सामन्याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असेल.
Covid-19 Treatment । कोरोना झाला, औषध घेतलं अन् बाळासोबत घडलं भलतंच; घटना वाचून येईल अंगावर काटा