नांदेड शहरात भाजप समर्थकांकडून बॅनर लावण्यात आले आहेत. ’50 खोके आणि 105 डोके! देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र’ असे आशय असणारे बॅनर फडणवीस समर्थकांनी लावले आहेत. त्यात आचार्य चाणक्य यांचा फोटो आणि शेजारी 50 डोकी वापरली आहेत. या बॅनरबाजीवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. यामध्येच आता अजित पवार यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे.
याबाबत बोलताना अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, नांदेडमध्ये लावलेल्या बॅनरवर. 50 खोके 105 डोके, असे लिहिले होते. भाजपवाले शिंदे गटाला 50 खोके म्हणत असतील तर हे खूप अवघड आहे. 50 खोके एकदम ओके, या घोषणा आम्ही दिल्या, त्यावेळी बऱ्याच जणांना वाईट वाटलं आहे. पण ही घोषणा आता तळागाळापर्यंत पोहचली असल्याचं अजित पवार म्हणाले आहेत.
दरम्यान, काल नांदेड शहरात आयटीआयजवळ ‘50 खोके, 105 डोके’ असे बॅनर लावले असल्याने शिंदे गट आणि भाजप हा वाद अजून शांत झाला नाही, असे दिसत आहे.