मांजर हा बहुतेक लोकांचा आवडता पाळीव प्राणी आहे. लोक आवडीने मांजर पाळतात. त्यांचे लाड केले जातात. परंतु, मांजर ( cat) आडवी जाणे अशुभ देखील मानतात. जेव्हा कधी रस्त्यात मांजर आडवी येते तेव्हा माणसे वाटच बदलून टाकतात. कारण, मांजर आडवी जाणे हे अनुचित प्रकार घडण्याचे संकेत ( Symbol) आहेत असे त्यांना वाटते.
यंदाही राज्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता; रोगराई वाढणार! भेंडवळच्या ‘घटमांडणी’ चा अंदाज
एवढंच नाही तर घराच्या आजूबाजूला मांजर रडली किंवा मेली तर लोकांना तो शाप वाटतो. मांजरी बाबतच्या या गोष्टींवर तुमचा विश्वास आहे का? किंवा या गोष्टी तुम्हाला खऱ्या वाटतात का? मागील कित्येक वर्षे लोकांच्या मनात हे गैरसमज आहेत. यामुळे मांजरीला फटकारले जाते. मांजर दिसली की वाट बदलतात. मांजर घरात रडू नये यासाठी घराबाहेर ठेवतात. ( Rumours about cat)
शरद पवारांचा भाजपला इशारा! म्हणाले,”भाजपने कोणाला फोडण्याचा प्रयत्न केला तर…”
मात्र मांजरीबाबत असणारे गैरसमज खरे आहेत, असा कोणताही पुरावा नाही. मांजर आडवी गेली किंवा रडली तर कोणताही अपघात होत नाही. या फक्त अफवा आहेत. याबाबत कोणतेही पुरावे उपलब्ध नाहीत. याला आपण अंधश्रद्धा म्हणू शकतो. यामुळे या सगळयावर विश्वास ठेवू नये. प्राण्यांना जीव लावणे हेच मोठे पुण्य असते.
विराट-अनुष्काला चाहत्यांकडून धक्काबुक्की! व्हिडीओ होतोय व्हायरल