“राज ठाकरेंवरील खोट्या केसेस मागे घेतल्या नाही तर शिंदे-फडणवीस सरकारला त्यांची जागा दाखवू” मनसे नेत्याचा गंभीर इशारा

"If the false cases against Raj Thackeray are not withdrawn, we will show Shinde-Fadnavis government their place" MNS leader's serious warning

पिपंरी चिंचवडमध्ये (Pipnri Chinchwad) 18 वे जागतिक मराठी संमेलन भरवण्यात आले आहे. यावेळी राज ठाकरे यांची मुलाखत झाली. यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी सध्याच्या राजकीय स्थितीवर भाष्य केलं. तसेच त्यांनी नरेंद्र मोदींवर देखील निशाणा साधला आहे. आपण गुजरातचे आहोत म्हणून फक्त गुजरातला प्राधान्य देणं पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांना शोभत नाही असं म्हणत त्यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. काल राज ठाकरेंनी ही टीका केली असतानाच आता मनसे नेते प्रकाश यांनी शिंदे-फडणवीस सरकारला लक्ष्य केलय.

धक्कादायक! दोन बसचा भीषण अपघात, 40 जागीच ठार तर 87 गंभीर जखमी

प्रकाश महाजन यांनी शिंदे-फडणवीस सरकारला इशारा दिला आहे. ते म्हणाले की, ” नवीन सरकार आल्यानंतर सर्व लोक शिवतीर्थवर येतायेत. मात्र या सरकारला वाटत नाही का राज ठाकरेंवर असलेल्या खोट्या केस मागे घ्याव्यात. जर केसेस मागे घेतल्या नाही तर या शिंदे-फडणवीस सरकारला त्यांची जागा दाखवून देवू, असा गंभीर इशारा त्यांनी दिलाय.

“आज मैं मूड बना लिया…”, गाण्यावर अमृता फडणवीस यांचा पुन्हा ठुमका; पाहा VIDEO

त्याचबरोबर, मनसे नेते प्रकाश महाजन यांनी भाजपवर आरोप केले आहेत. राज ठाकरे यांचा अयोध्येचा दौरा रद्द होण्यामागे भाजपचा हात असल्याचा आरोप प्रकाश महाजन यांनी केलाय. त्यांच्या या वक्तव्याने चर्चाना उधाण आले आहे.

राहुल गांधी टी-शर्टच्या आतमध्ये थर्मल घालतात; सोशल मीडियावर फोटो व्हायरल

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *