औरंगाबाद: समाजात शिक्षकांवर फार मोठा विश्वास ठेवला जातो. विद्यार्थ्यांना योग्य गोष्टी करण्याची शिकवण शिक्षक देत असतात. परंतु, शिक्षकच चुकीचे कृत्य करत असेल तर? औरंगाबाद येथील एका कॉलेजमध्ये प्राचार्यांनी स्वतःच्याच कॉलेजमधून, चक्क दहा लाख रुपयांची चोरी ( Robbery in collage) केल्याची घटना घडली आहे.
“गुटखा खा, दारू प्या,आयोडेक्स खा पण…”; भाजपा नेत्याचं वक्तव्य चर्चेत
सूत्रांच्या माहितीनुसार, नीलेश नामदेव आरके (32, रा. गल्ली क्र. 6, आंबेडकरनगर) असे या प्राचार्यांचे नाव आहे. त्यांनी 21 ऑक्टोंबर रोजी रात्री कॉलेजमध्ये चोरी केली. यामध्ये त्यांनी जवळपास 10 लाखांची रोकड लंपास केली.
पीएम किसान योजनेत झाला मोठा बदल; लवकरच जमा करावी लागणार ‘ही’ कागदपत्रे…अन्यथा पैसे मिळणार नाहीत
या कॉलेजचे संस्थाचालक यांनी दिलेल्या चोरीच्या फिर्यादीवरून पोलिसांनी कॉलेजमध्ये जाऊन संशयितांची चौकशी केली. तेव्हा हा प्रकार उघडकीस आला.चोरी झालेल्या दिवशी नीलेश आरके 12 वाजेपर्यंत कॉलेजमध्ये होते. आरके यांची चौकशी केल्यास त्यांनी पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली. परंतु, चौकशी नंतर बुलढाणा ( Buldhana) येथून रोकडसह पलायन करताना आरके यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
तरुणांसाठी आनंददायक बातमी! राज्यात 18 हजारांपेक्षा जास्त पोलीस पदांची भरती; असा करा अर्ज
महत्त्वाची गोष्ट म्हणजे नीलेश आरके यांनी चोरी केलेल्या रकमेतील सुमारे तीन लाख रुपये रमी खेळताना उडवले होते. ( Teacher spends 3 lakh in rummy game) समाजासाठी आदर्श समजल्या जाणाऱ्या शिक्षकांचे असे कृत्य निंदनीय असल्याचे म्हंटले जात आहे.