Asia Cup 2023 । पावसाने आशिया स्पर्धेत (Asia Cup) चांगलाच घोळ घातला आहे. सामान्यांपेक्षा पावसामुळे ही स्पर्धा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. असा एकही सामना नाही ज्यात पावसाने थैमान घातले नाही. उद्या भारत विरूद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) सामना रंगणार आहे. जर या सामन्यात पावसाने खोडा घातला तर कोणत्या संघाला ट्रॉफी दिली जाणार? असे सवाल उपस्थित केले जात आहेत. (Asia Cup 2023 Final)
Politics News । बिग ब्रेकिंग! १६ आमदार अपात्रतेसंदर्भात महत्त्वाची माहिती आली समोर
उद्या हवामान खात्याकडून (IMD) 80 टक्के पावसाची शक्यता वर्तवली आहे. 17 सप्टेंबर रोजी हा अंतिम सामना कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमवर दुपारी 3 वाजता खेळवला जाणार आहे. या सामन्यात संध्याकाळी 7 वाजेपर्यंत पाऊस सुरू राहील. जर पावसामुळे सामना होऊ शकला नाही तर दुसरा दिवस रिझर्व्ह डे (Reserve Day) म्हणून ठेवला आहे.
जर अंतिम सामन्याचा निकाल रिझर्व्ह डेला लागला नाही तर दोन्ही संघांना संयुक्त विजेता घोषित करण्यात येईल. सामन्याचा निकाल मिळविण्यासाठी या दोन्ही संघांना प्रत्येकी 20-20 ओव्हर्स खेळावे लागेल. त्यामुळे आशिया कप 2023 च्या फायनल सामन्यांकडे संपूर्ण क्रिकेट जगताचे लक्ष लागले आहे.