Site icon e लोकहित | Marathi News

सरकारने शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकले तर महाराष्ट्रातील एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही – राहुल गांधी

If the government listens to farmers, no farmer in Maharashtra will commit suicide - Rahul Gandhi

राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली ‘भारत जोडो यात्रा’ ( Bharat Jodo Yatra) अनेकांची मने जिंकत आहे. या यात्रेत ते लहानांपासून-थोरांपर्यंत सर्वांशी संवाद देखील साधत आहेत. दरम्यान, राहुल गांधींची भारत जोडो यात्रा आज शेगावमध्ये पोहोचली आहे. शेगाव येथे आयोजित जाहीर सभेत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली आहे.

धक्कादायक! आफताबच्या २५ गर्लफ्रेंड्स असल्याची माहिती आली समोर

यावेळी बोलताना राहुल गांधी म्हणाले की, विरोधक म्हणतायत की, या यात्रेची काय गरज आहे. पण ही भारत जोडो यात्रा मन की बात करण्यासाठी नव्हे तर लोकांची मनातील गोष्टी समजून घेण्यासाठी आहे. असं राहुल गांधींनी स्पष्ट केले आहे.

म्हशींची दूध क्षमता वाढवण्यासाठी ऑक्सिटोसिनचे इंजेक्शन दिल्याने दुग्ध उत्पादकांना अटक

पुढे ते म्हणाले की. ज्यावेळी आमचं सरकार सत्तेत होत तेव्हा विदर्भातील अनेक शेतकरी अडचणीत आले होते. त्यावेळी आम्ही तातडीने पॅकेज दिलं. पण आता शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देखील मिळत नाही. शेतकरी मोठ्या प्रमाणात आत्महत्या करत आहेत. जर सरकारने शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकले तर महाराष्ट्रातील एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही. आत्महत्या बंद होतील, असं देखील राहुल गांधी यांनी म्हंटल आहे.

महाविद्यालयाच्या परिसरात मुलींची तुफान हाणामारी; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

Spread the love
Exit mobile version