आंदोलन करून प्रश्न सुटले नाहीत तर १८ तारखेपासून काय करायचे ते सांगतो; राजू शेट्टींचा गंभीर इशारा

If the issues are not resolved by protesting, he tells what to do from 18th; Serious warning from Raju Shetty

राज्यात सध्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून सरकारला धारेवर धरले जात आहे. या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी ( Raju Shetti) यांनी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं (swabhimani shetkari sanghtna) ऊस उत्पादकांना दोन टप्प्यात एफआरपी देण्याऐवजी एकरकमी देण्याची मागणी केली आहे. यासाठी आज आणि उद्या दोन दिवस ऊसतोड बंद आंदोलन करण्यात येणार आहे.

कुत्र्याला लागला पाणीपुरी खाण्याचा नाद! पाहा व्हायरल व्हिडीओ

यामुळे ऊस उत्पादकांच्या विविध मागण्यांसाठी आज आणि उद्या स्वाभिमानीने ऊसतोड बंद आंदोलन पुकारलं आहे. दरम्यान, या आंदोलनावेळी दोन दिवसात जर कारखाने सुरु ठेवले तर संघर्ष होणार असल्याचा गंभीर इशारा राजू शेट्टीं यांनी दिला आहे.

या आंदोलनावेळी अनेक मागण्यांची मागणी होणार आहे. त्यामध्ये ऊस उत्‍पादक शेतकऱ्यांना एकरकमी FRP देण्यात यावी, हिवाळी अधिवेशनामध्ये यासाठीचा कायदा मंजूर करावा, त्याचबरोबर एफआरपीचे सूत्र बदलून त्यामध्ये वाढ देखील करावी या मागण्या असणार आहेत. या मागण्यांसाठी राज्यभरात आज आणि उद्या आंदोलन करण्यात येणार आहे.

खुशखबर! शेतकऱ्यांना निम्याचं किमतीत मिळणारं ट्रॅक्टर; ‘असा’ करा अर्ज

या आंदोलनामुळे कारखानदारांना दोन दिवस कारखाने बंद ठेवण्यास सांगितले आहे. जर कारखाने बंद ठेवले नाहीत तर संघर्ष होणार असल्याचा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे. दरम्यान, आंदोलनातील सर्व मागण्यांना पाठिंबा द्यावा अशी मागणी राजू शेट्टी यांनी सर्व कारखानदारांना केली आहे.

शेतकऱ्यांना दिवसाच वीज मिळावी; युवासैनिक आक्रमक

यावेळी शांततेच्या मार्गाने आंदोलन करा, जर प्रश्न सुटले नाहीत तर 18 तारखेपासून काय करायचे ते मी सांगतो असे शेट्टी म्हणाले आहेत. या आंदोलनाला वाहन चालक, ऊसतोड कामगार त्याचबरोबर साखर कारखानदार यांनी प्रतिसाद द्यावा असे आवाहन देखील राजू शेट्टी यांनी केले आहे.

७० वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात पडली १९ वर्षांची तरुणी; लव्हस्टोरी वाचून तुम्हीही व्हाल आश्चर्यचकित

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *