पुणे : सध्या ईडीकडून ग्रीन एकर या कंपनीची चौकशी सुरू आहे. अशी सूत्रांनी माहिती दिली आहे. दरम्यान रोहित पवार हे या कंपनीचे माजी संचालक राहिलेले आहेत. त्यामुळे या प्रकरणी रोहित पवारांची (Rohit Pawar)चौकशी होणार असून त्यांच्या अडचणी देखील वाढणार असल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. राष्ट्रवादीतर्फे (NCP) आज महागाईच्या विरोधात आंदोलन करण्यात येत आहे. यावेळी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी एक वक्तव्य केले आहे. “आमच्या कुटुंबातील कोणालाही नोटीस आली तरी आमची सहकार्याचीच भूमिका असते, असे वक्तव्य केले आहे.
Ritesh Deshmukh: आशिया चषक स्पर्धेमध्ये भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय, रितेश देशमुखने केले कौतुक
न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे
रोहित पवार यांची कोणतीही चौकशी सुरू झालेली नाही. अशा बातम्या केवळ माध्यमांमध्ये सुरू आहेत. माझे रोहित यांच्याशी बोलणे झाले आहे. त्यांना अद्याप नोटीस आलेली नाही माझा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे आम्हाला लपवायची काही गरज नाही. त्यामुळे अशी काही चौकशी झाली तर आम्ही उत्तर देऊ, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
Amol Mitkari: शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार – अमोल मिटकरी
राष्ट्रवादीने जनआक्रोश आंदोलन
आज खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने पुण्यातील कोथरूड परिसरात जनआक्रोश आंदोलन केले आहे. हे जनआक्रोश आंदोलन पेट्रोल, डिझेल, सीनजी, घरगुती गॅसच्या दरवाढीविरोधात केले. यावेळी त्यांनी रोहित पवार (Rohit Pawar) यांची चौकशी आणि नोटीस तसेच बारामती मतदारसंघ आणि भाजपा, मनसे यांच्या अनुषंगाने प्रतिक्रिया दिली आहे. चांदणी चौकातील वाहतूककोंडीविषयीही त्यांनी मत व्यक्त केले.