
मुंबई : मागच्या काही दिवसांपासून दसरा मेळाव्यावरून राजकीय वातावरणात चांगलीच उलथापालथ झालेली पाहायला मिळत आहे. शिवसेना आणि एकनाथ शिंदे गट हे दोन्ही गट दसरा मेळाव्यात आपआपली ताकद दाखवण्याच्या तयारीत आहेत. दोन शिवसेना गट तयार झाल्याने दसरा मेळावा कोण घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर दुसरीकडे आज शिवसेनेच्या वतीने नेस्को सभागृहात कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्या मध्ये उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केलाय. उद्धव ठाकरेंच्या भाषणाने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले.
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले, शिंदे गटाकडून शिवसेनेला संपवण्याचं काम केलं जात आहे . ते सर्वजण एकत्र येत आहेत. पण संघर्ष झाला किंवा रक्तपात झाला तर आपल्यात आणि त्या गद्दारांमध्ये होईल, असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलं आहे.
Lumpy: देशात ‘लम्पीचा’ धुमाकूळ! जनावरांच्या मृत्यूचा आकडा वाढला, पशुपालकांनो अशी घ्या काळजी..
पुढे त्यांच्या भाषणामध्ये उद्धव ठाकरे म्हणाले, सध्या महाराष्ट्रात कारभार कसा चालू आहे? हे कुणालाच माहीत नाही. पण सर्वजण एकत्र येऊन शिवसेनेला (Shivsena) बदनाम करायचं काम करत आहेत. पण सगळे जरी आले तरी आसमान काय असतं ते आम्ही त्यांना दाखवू. पण तुमच्या लक्षात आणून देतो की तुमची ताकद किती आहे, हे तुम्हाला कळालं नाही. पण आपल्या विरोधकांना कळलं आहे. असा उल्लेख उद्धव ठाकरेंनी त्यांच्या भाषणामध्ये केला आहे.