आपल्याला माहित आहे की, दिवाळी (Diwali) जवळ आली की नोकरदार वर्ग बोनसची (bonus) वाट पाहू लागतात. कर्मचाऱ्यांच्या मनात आपला बॉस (Boss)आपल्याला यंदाच्या दिवाळीला काय बोनस देणार याकडे उत्सुकता लागलेली असते. दरम्यान दिवाळी जवळ आल्याने एका मालकाने कर्मचाऱ्यांना आगळा वेगळा बोनस दिला आहे. या मालकाने आपल्या कर्मचाऱ्यांना दिलेली दिवाळीची भेट (gift) पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, “बॉस असावा तर असा!”.
Rutuja Latke: अंधेरी पोटनिवडणुकीतून ऋतुजा लटकेंचा बिनविरोध निवडून येण्याचा मार्ग मोकळा, कारण…
ही घटना तामिळनाडूमध्ये घडली आहे. एका सोन्याच्या दुकानाच्या मालकाने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी तब्बल १ कोटी २० लाखांच्या भेटवस्तू खरेदी केल्या आहेत. विशेष म्हणजे भेटवस्तू लहान नसून चक्क कार आणि बाईक्स देण्यात आल्या आहेत. जयंतीलाल चयंती यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना दिवाळीची भेट म्हणून आठ कार आणि १८ बाईक्स दिल्या आहेत. दरम्यान, दिवाळीची भेटवस्तू म्हणून कार आणि बाईक्स मिळाल्यामुळे कर्मचारी खूपच खुश आणि भावूकही झाले होते.
Virat Kohli: विराट कोहली सोबत ती सुंदर मुलगी कोण? चाहत्यांना पडला प्रश्न; चर्चाना उधाण
जयंतीलाल म्हणाले, ‘माझे कर्मचारी ही माझे कुटुंबच आहेत. कारण प्रत्येक परिस्थितीत त्यांनी मला साथ दिली आहे. इतकंच नाही तर प्रत्येक प्रसंगात ते माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहेत. मला कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून त्यांनाही आनंद मिळतो. कर्मचाऱ्यांमुळेच मी माझ्या व्यवसायात नफा कमवत आहे. हे कर्मचारी माझ्या व्यवसायाचे मजबूत स्तंभ आहेत. त्यांच्यामुळेच मी एक यशस्वी उद्योजक आहे.’
BMW ने सादर केली आपली दुसरी पिढी, ‘ही’ आहेत कारची वैशिष्ट्ये