विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) त्यांच्या रोखठोक वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. ते सत्ताधाऱ्यांवर कायम टीका करत असतात. सत्ताधाऱ्यांवर टीका करण्याची ते एकही संधी सोडत नाहीत. कायम कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावरून ते टीका करतच असतात. यामध्येच आता अजित पवार यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
काहीतरी शिजतंय? मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेऊन नाना पाटेकर यांनी केली ‘या’ विषयावर चर्चा
ज्यांच्या वडिलांनी पक्ष निर्माण केला, त्यांचाच पक्ष काढून घेतला आणि चिन्ह काढलं. पक्ष आणि चिन्ह निवडणूक आयोगाने दिलं असलं तरी हे जनतेला पटलंय का? याचा देखील विचार करायला हवा. जर तुमच्यात धमक होती तर दुसरा पक्ष काढायचा होता . कोणी अडवलं होतं तुम्हाला? असा प्रश्न अजित पवार यांनी उपस्थित केला. कोल्हापुरमध्ये कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला संबोधित करताना अजित पवार यांनी हा प्रश्न केला.
मुंबईत सलमान खान बांधणार 19 मजली आलिशान हॉटेल, काय काय असेल यात? वाचा सविस्तर
जनतेसमोर जाण्यासाठी राज्यकर्त्यांना कोणताच मुद्दा राहिलेला नाही. म्हणून भावानिक मुद्दे समोर आणले जातं आहेत. सत्तेची नशा त्यांच्या डोक्यात चढली आहे. असं म्हणत अजित पवारांनी एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. आता एकनाथ शिंदे या टीकेला प्रत्युत्तर देणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दररोज बडीशेप खाण्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहिती आहेत का? वाचून व्हाल थक्क