विरंगुळा म्हणून आपण च्युइंगम ( Chewing gum ) चघळत असतो. काही तरुण कॉलेजमध्ये, चित्रपटगृहामध्ये तसेच चालताना च्युइंगम खात असतात. च्युइंगम खाल्ल्याने भूक लागत नाही असा काही तरुणांचा गैरसमज असल्याने काही तरुण नेहमीच च्युइंगम चघळतात. परंतु सतत च्युइंगम चघळल्याने आरोग्याला धोका ( Health hazard ) निर्माण होऊ शकतो. एका संशोधनातून समोर आले आहे की पुदिनासोबत च्युइंगम चघळले की शरीरावर याचा परिणाम ( Its effect on the body ) होऊ शकतो.
संजय राऊत काढणार नवीन चित्रपट! नावही केले जाहीर; म्हणाले, “केरला स्टोरी सारखे…”
च्युइंगम जास्त प्रमाणात चघळल्याने पोटामध्ये गॅस तयार होऊन पोट फुगण्याची देखील शक्यता असते. च्युइंगममध्ये कृत्रिम ( Artificial ) तयार केलीली चव आणि प्रिझरव्हेटीव्ह केल्याने डोकेदुखीचा त्रास जाणवतो. च्युइंगम चघळल्यामुळे जंक फूड ( Junk food ) खाण्याची इच्छा जागृत होते.
मजुराच्या खात्यात १७ रुपयांऐवजी आले १०० कोटी, मग झालं असं काही वाचून तुम्हीही व्हाल थक्क!
च्युइंगम चघळण्याचे तोटे –
दंत समस्या – च्युइंगममध्ये साखर असेल तर बॅक्टेरिया होऊन दात किडण्याची शक्यता असते. च्युइंगम जर शुगर फ्री असेल तर त्यामध्ये अम्लीय घटक जास्त असल्यामुळे कालांतराने दात खराब होतात
जबड्याच्या समस्या – च्युइंगम जास्त प्रमाणात चघळल्यामुळे जबड्याच्या स्नायूंवर ताण येऊ शकतो. जवळजवळ दुखणे डोके दुखणे अशा समस्या निर्माण होतात.
शेतातील काम करताना ट्रॅक्टरखाली सापडून बारामतीतील युवा शेतकऱ्याचा मृत्यू
कृत्रिम घटक – बरेच च्युइंगम हे कृत्रिमरित्या व वेगवेगळ्या फ्लेवरने बनवले जातात. त्यामुळे काही मानवाच्या शरीरावर याचा परिणाम होतो.
पर्यावरणीय प्रभाव – च्युइंगमची योग्य विल्हेवाट लावता येत नसल्यामुळे कचरा आणि पर्यावरणावर याचा परिणाम होतो.
जेठालाल होण्याआधी दिलीप जोशी करत होते ‘हे’ काम, वाचून व्हाल थक्क