आजकाल लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांच्या हातात स्मार्टफोन (smartphone) दिसत आहे. मग तो नवीन घेतलेला असो किंवा सेकंड हॅंड. प्रत्येकाला स्मार्टफोन पाहिजे म्हणजे पाहिजेच असतो. पण तुम्ही जर सेकंड हॅंड स्मार्टफोन घेत असला तर थांबा. कारण ही बातमी नक्कीच तुमच्यासाठी म्हहत्त्वाची आहे.
जर तुम्ही चोरीचा स्मार्टफोन विकत घेतला आणि पोलिसांनी तुम्हाला पकडले. तर तुम्हाला 3 वर्षांच्या शिक्षेसह 1 लाख रुपये दंड भरावा लागू शकतो. माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 च्या कलम 66 (b) अंतर्गत ही शिक्षा देण्यात आली आहे. ज्यामध्ये शिक्षेसोबत दंडही होऊ शकतो. त्यामुळे हा जुना स्मार्टफोन तुम्हाला महागात पडू शकतो.
क्रिकेट प्रेमींसाठी वाईट बातमी! दुखापतीमुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप मधून ‘हा’ खेळाडू बाहेर
दरम्यान, तुम्ही जर जुना स्मार्टफोन विकत घेत असाल तर स्मार्टफोन विकत घेताना त्या व्यक्तिची पुर्ण चौकशी करा. त्या व्यक्तीला ओळखता येईल असे त्यांचे आधार कार्ड किंवा मोबाईलचे बिल त्या व्यक्तीकडून मागून घ्या. तसेच त्या बिलावर जीएसटी क्रमांक आहे का? हे व्यवस्थित पाहून घ्या. जरी तुम्हाला पोलिसांनी पकडलं तरी तुम्हाला मोबाईल कुठून घेतला यांची माहिती देता यावी. अन्यथा तुमच्यावर कारवाई होऊ शकते.
हनिमूनला गेलेल्या पती-पत्नीसोबत मध्यरात्री घडले भयानक! घटना वाचून बसेल धक्का