मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प काल (दि.1) जाहीर झाला. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यावेळी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. सामन्यांना दिलासा देणारा हा अर्थसंकल्प असल्याचे म्हंटले जात आहे. मात्र यावर अनेक राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. यामध्येच अर्थसंकल्प इंग्रजीत सादर करण्यात आल्याने बच्चू कडू (Bachhu Kadu) यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
जितेंद्र आव्हाडांना अटक होणार? ‘त्या’ एका वक्तव्याने राजकीय वर्तुळात उडाली खळबळ
बच्चू कडू म्हणाले, “सर्वात मोठी दु:खाची गोष्ट म्हणजे की अर्थसंकल्प इंग्रजी भाषेतून मांडला गेला आहे. कुसुमाग्रज म्हणत होते भाषा मरते आणि त्यासोबतच देशही मरत असतो. ज्या भाषिकांनी तुम्हाला निवडून दिलं आहे त्या भाषेमध्ये तुम्ही सभागृहात बोललं पाहिजे. जेणेकरून सर्वसामान्य लोंकाना ते समजेल. त्यामुळे हिंदी बोलता येत नसेल तर दुसऱ्याकडून अर्थसंकल्प सादर करावा असं बच्चू कडू म्हणाले आहेत.
महाराष्ट्रात प्रथमच महिला एसटी चालवणार! प्रशिक्षण आले अंतिम टप्प्यात
अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या घोषणा
1) अगामी काळात कृषी क्षेत्रासाठी डिजीटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर अॅग्रीकल्चर अॅक्सिलरेटर फंड उभारण्यात येणार आहे. यामुळे शेती स्टार्टअपना प्रोत्साहन मिळणार आहे.
2) भरड धान्याचे उत्पादन, त्याची विक्री आणि संशोधन यासाठी सरकार पुढाकार घेणार.
3) देशात नवीन 157 नर्सिंग कॉलेज स्थापन होणार.
4) लहान व किशोरवयीन मुलांसाठी नॅशनल डिजिटल लायब्ररी स्थापन होणार.
5) जेष्ठ नागरिकांना बचत योजनेवर सुविधा मिळणार
6) पंतप्रधान आवास योजनेचा निधी 66 टक्क्यांनी वाढला.
7) पायाभूत सुविधांसाठी निधीमध्ये 33 टक्क्यांनी वाढ
8) देशात 50 नवीन विमानतळ उभारण्यात येणार आहेत.
अर्थसंकल्प जाहिर होताच अंबादास दानवेंनी उपस्थित केला प्रश्न; म्हणाले, “महागाई अन् बेरोजगारीचं काय?”