चाहता असावा तर असा! अपंग व्यक्ती मित्राच्या पाठीवर बसून गेला ‘पठाण’ चित्रपट पहायला

If you want to be a fan! A disabled person sat on a friend's back to watch the movie 'Pathan'

बॉलिवूड कलाकारांचे लाखो चाहते असतात. मात्र यामध्ये काही चाहते असे असतात की, ते कलाकारांसाठी काहीही करायला तयार असतात. काही चाहते तर आवडत्या कलाकाराचा टॅटो हातावर गोंधून घेतात. काही चाहते स्वतःच्या रूममध्ये कलाकारांचे फोटो लावतात. असे अनेक वेगेवेगळे चाहते बॉलिवूड कलाकारांचे असतात. यामध्येच आपण शाहरुख खानकडे पाहिलं तर शाहरुखचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. सध्या त्याच्या एका चाहत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

एका रात्रीत बनला लखपती, तरुणाला ७० लाखांची लागली लॉटरी

शाहरुखचा पठाण हा चित्रपट मागच्या चार दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी शाहरुखचे चाहते थिएटर बाहेर प्रचंड गर्दी करत आहेत. आता या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसतंय की एक अपंग व्यक्ती ज्या व्यक्तीला चालायला देखील येत नाही. हा व्यक्ती शाहरुख खानचा पठाण हा चित्रपट पाहण्यासाठी मित्राच्या पाठीवर बसून आला आहे.

सानिया मिर्झाची एकूण संपत्ती वाचून तुम्हीही व्हाल थक्क!

हा व्हिडीओ Halim Hoque या ट्विटर अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ शेअर करत कॅप्शन मध्ये लिहिण्यात आले आहे की, “शाहरुखचा एक अपंग चाहता जो स्वतःच्या पायावर चालू शकत नाही. तो बिहारमधील भागलपूर येथून त्याच्या मित्राच्या खांद्यावर स्वार होऊन पश्चिम बंगालमधील मालदा येथील सामसी पवन टॉकीज सिनेमागृहात पठाण चित्रपट पाहण्यासाठी गेला होता.”

बिग ब्रेकिंग! गायक कैलाश खेर यांच्यावर जीवघेणा हल्ला

सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. नेटकरी या व्हिडिओवर वेगेवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. हा व्हिडीओ ९८ हजारपेक्षा जास्त लोकांनी पहिला असून ५०० पेक्षा जास्त लोकांनी लाईक केला आहे.

“दिसेल तिथे ठोकून काढा”, बागेश्वर बाबांच्या संत तुकाराम महाराजांबद्दलच्या आक्षेपार्ह विधानावर अमोल मिटकरी संतापले

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *