‘बिग बॉस’ मराठीच्या (Bigg Boss Marathi)चौथ्या पर्वामध्ये सहभागी झालेले प्रसिद्ध अभिनेते किरण माने (Kiran Mane) यांनी टॉप ३ पर्यंत मजल मारली. बिग बॉसच्या घरात सातारचा (Satara) बच्चन अशी किरण माने यांची ओळख होती. सातारा आणि आसपासच्या भागात किरण माने यांचे प्रचंड फॅन्स फॉलोवर्स आहेत. किरण माने सोशल मीडियावर (Social Media) सक्रिय असतात. माने यांनी शिवजयंतीनिमित्त (Shiva Jayanti) एक पोस्ट शेअर केली आहे. जी सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची जीएसटी बाबत मोठी घोषणा! जीएसटी
पोस्ट करताना किरण माने यांनी लिहिले की, ..शिवराय कशाच्या सहाय्यानं लढले? शारीरिक बळाच्या? तलवारीच्या? की कुणा सहकार्याच्या सल्ल्याच्या? नाय नाय नाय माझ्या दोस्तांनो… शिवरायांची ताकद एकच होती… त्यांची ‘अनल्प’ बुद्धी ! ‘अनल्प’ म्हणजे अफाट, अमर्याद.
तसेच, शिवरायांनी प्रत्येक लढाया फक्त ताकदीवर, किंवा शस्त्रास्त्रांच्या मदतीनं केलं नाही. तर प्रत्येक लढाई शिवराय ‘बुद्धीनं’ लढले. शक्तीचा आणि शस्त्रांचा वापर करण्याआधी, त्यांच्या प्रत्येक चालीवर बुद्धीचा लगाम होता. खर्या अर्थानं ‘मास्टरमाईंड’, असे त्यांनी म्हटले आहे.
युवा शेतकऱ्याची कौतुकास्पद कामगिरी! गव्हाच्या पिकातून साकार
यादरम्यान, त्यांनी चाहत्यांना एक सल्ला दिला आहे. ते म्हणाले की, आपल्याला जर शिवरायांच्या महान कार्याचा अभिमान बाळगायचाय, तर त्यांच्या बाकीच्या सगळ्या गोष्टींबरोबरच या ‘अनल्प बुद्धी’चा वारसा घेणं आजच्या काळात लै लै लै गरजेचं आहे. तसेच त्यांनी सर्वांना शिवजयंतीच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या.