Agri News । देशातील अनेक कुटुंबांचा शेतीवरच (Agri) उदरनिर्वाह चालतो. अनेकजण शेतीसोबत जोडव्यवसाय करतात जसे की पशुपालन (Animal husbandry) किंवा शेळीपालन (Goat rearing). यापैकी शेळीपालन हा असा व्यवसाय (Goat rearing business) आहे की खूप कमी जागेत आणि कमी खर्चात केला जातो. विशेष म्हणजे तरुणवर्ग नोकरी सोडून या व्यवसायाकडे वळू लागला आहे. जर तुम्ही विशिष्ट शेळीच्या जातीचे पालन केले तर तुम्हाला काही महिन्यातच करोडपती होता येईल. (Latest Marathi News)
सिरोही जातीची शेळी
शेळीपालन करत असताना सर्वात महत्त्वाची असते ती म्हणजे शेळींची जात. कारण शेळींच्या जातीवर या व्यवसायाचा नफा ठरलेला असतो. जितकी चांगली जात तितका चांगला नफा. बाजारात अनेक शेळींच्या जाती आहेत. त्यापैकी सिरोही जातीची शेळी खूप लोकप्रिय आहे. अनेकजण या जातीची शेळी पाळतात. विशेष म्हणजे या जातीच्या बोकडांना ईदच्या कालावधीत मोठ्या प्रमाणावर मागणी असते. (Sirohi Goat)
खरेदी करताना लक्षात ठेवा या गोष्टी
या जातीची शेळी खरेदी करत असताना काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते. नाहीतर अर्थी फटका बसण्याची शक्यता असते.
- जास्त वयाच्या शेळ्या खरेदी करणे टाळावे.
- जास्त दूध देणाऱ्या शेळीची खरेदी करावी.
- राज्यातील वातावरणामध्ये सेट झालेल्या शेळ्या खरेदी कराव्यात. (Sirohi Goat Rearing Business)
Bhiwandi Building collapses । भिवंडीत दुमजली इमारत कोसळून 2 जणांचा दुर्दैवी मृत्यू तर पाच जखमी
अशा प्रकारे करा व्यवस्थापन
- शेळीला दिवसातून पाच ते सहा किलो चारा यात 70 टक्के हिरवा चारा आणि 30 टक्के सुखा चारा देणे गरजेचे आहे.
- स्वच्छ आणि मुबलक प्रमाणात पाणी द्यावे.
- वेळेत लसीकरण करणे खूप महत्त्वाचे आहे.
- शिवाय या जातीच्या शेळ्यांचे डी वॉर्मिंग सहा महिन्यातून एकदा करा.
- तसेच वयानुसार व त्यांची शारीरिक क्षमता पाहून शेडमध्ये वेगवेगळे कप्पे तयार करणेही खूप महत्त्वाचे आहे.
- समजा तुम्ही बंदिस्त शेळीपालन करत असाल तर प्रत्येक शेळीला दिवसाला 15 ते 20 ग्रॅम मिनरल मिक्स्चर द्यायला विसरू नका.
Accident News । भाजप माजी आमदाराच्या मुलाचा भीषण अपघात! कारचा अक्षरशः चुराडा, आमदार मुलाचा हातच..
जाणून घ्या शारीरिक वैशिष्ट्ये
- बोकडाचे वजन 60 ते 65 किलो आणि मादीचे वजन 45 ते 50 किलो पर्यंत असते. ही शेळी तपकिरी रंगाची आणि तिच्या अंगावर विविध प्रकारच्या रंगछटा पाहायला मिळतात.
- शारीरिक रचना आणि रंगांच्या विविधतेमुळे या जातींच्या बोकडांना ईदच्या कालावधीत जास्त मागणी असते.
- यातील काही शेळ्यांना शिंगे असतात तर काहींना शिंगे नसतात. डोळे काळे आणि तपकिरी रंगांचे असतात.