मुंबई: मानसी नाईक ( Mansi Naik) ही मराठी पडद्यावरील गाजलेली अभिनेत्री आहे. अनेक गाण्यांमधून व चित्रपटांमधून चाहत्यांना वेड लावणारी ही अभिनेत्री सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. मागील काही दिवसांपासून तिच्या वैवाहिक आयुष्यातील घटनांमुळे ती चांगलीच चर्चेत आहे. ती प्रदीपसोबत राहणार नसून घटस्फोटासाठी अर्जही दिला आहे.
रस्त्यावरील धुळीमुळे भीषण अपघात! एकजण जागीच ठार तर पाच गंभीर जखमी
मानसीने प्रदीप खरेरावर अनेक आरोप केले होते. आता प्रदीपने तिच्या या आरोपांबद्दल अप्रत्यक्षरित्या एक इंस्टाग्राम पोस्ट केली आहे. त्याच्या या पोस्टमुळे सध्या तो चर्चेत आला आहे. मानसीचा नवरा प्रदीप हा सोशल मीडियावर कायम सक्रिय असतो.
श्रीगोंदा तालुक्यातील आढळगाव परिसरात धुळीमुळे भीषण अपघात! एकजण जागीच ठार तर पाच गंभीर जखमी
मागच्या काही दिवसांपासून प्रदीप हा इन्स्टाग्रामवर वेगवेगळ्या स्टोरी शेअर करताना दिसत आहे. आता नुकतंच प्रदीपने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तो व्यायाम करताना दिसत आहे. याला व्हिडीओ कॅप्शन देत त्याने लिहले की, “मी प्रत्येक गोष्टींवर प्रतिक्रिया देत नाही, पण माझ्यावर विश्वास ठेवा मी सर्व गोष्टींवर काळजीपूर्वक नजर ठेवतो”.
सोन्याचा मोबाईल सोन्याची कार वापरणाऱ्या पुण्याच्या गोल्डन गाईज बद्दल वाचा सविस्तर माहिती
सध्या त्याची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. या पोस्टवर नेटकरी वेगेवेगळ्या कमेंट करत आहेत.
कष्टकरी हातालाच देव भेटे; हेच बहिणाबाईंच तत्वज्ञान – इंद्रजीत भालेराव