Supriya Sule । मुंबई : राज्यात सध्या शिंदे-फडणवीस-पवार सरकार आहे. परंतु विविध कारणावरून सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने येतात. अजित पवार (Ajit Pawar) हे सत्तेत सहभागी झाल्याने त्यांच्यावर विरोधकांकडून खूप टीका होत आहे. सध्या खासदार सुनिल तटकरे (Sunil Tatkare) हे अजित पवार गटात आहेत. आता त्यांचे निलंबन करावे अशी मागणी पवार गटाकडून करण्यात आली आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. (Latest Marathi News)
पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला (Om Birla) यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी सुनील तटकरेंचं (Supriya Sule vs Sunil Tatkare) तातडीने निलंबन करावे अशी मागणी करण्यात आली आहे. 2 जुलै 2023 रोजी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांनी पक्षाची घटना आणि नियमांचे उल्लंघन केले आहे. यामुळे त्यांना बडतर्फ करून अपात्र करावे, अशी मागणी सुळे यांनी चार महिन्यांपूर्वी केली होती.
Manoj Jarange Patil । आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण घेतले मागे
परंतु चार महिने उलटून यावर कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे सुप्रिया सुळे यांनी पत्रातून खंत व्यक्त केली आहे. कारवाई होत नसल्याने परिशिष्ट दहाचे उल्लंघन होत आहे, असेही सुप्रिया सुळेंनी स्पष्ट केले आहे. ‘तटकरे यांच्यावर राज्यघटनेच्या १० व्या अनुसूचीनुसार तातडीने निलंबनाची कारवाई करण्यात यावी, त्यांनी पक्ष विरोधी कृत्य केले आहे’, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी पत्रातून केली आहे.
Agricultural Tips । घरबसल्या मिनिटात समजेल खत दुकानांमध्ये खत शिल्लक आहे की नाही, फक्त करा ‘हे’ काम