दिल्ली : बरेच शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसाय (Dairying) करतात. सध्या दुग्ध व्यवसायाला चांगले दिवस आलेत. दुधाला चांगला भाव मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांनी दूध व्यवसायाकडे वळावे म्हणून सरकार सतत प्रोत्साहन येत असते. त्याचबरोबर दुग्धव्यवसाय उघडण्यासाठी सरकार शेतकर्यांना आर्थिक मदत देखील करते.
ट्रॅक्टर पलटून ३ महिलांचा मृत्यू तर ५ महिला गंभीर जखमी
केंद्र सरकारने (Central Govt) आता एक महत्वपूर्ण निर्णय घेतलाय. सरकार आता देशातील प्रत्येक पंचायतीमध्ये डेअरी सुरू करण्याचा विचार करत आहे. आता याबाबत केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह (Amit Shah) म्हणाले की, दुग्धव्यवसायाची यंत्रणा ही सहकारी असावी. यामुळे शेतकर्यांची गरिबी दूर होऊ शकते. अनेक शेतकऱ्यांचे जीवन या व्यवसायावर अवलंबून आहे.
खुशखबर! जमीन खरेदीसाठी मिळतंय शंभर टक्के अनुदान, वाचा सविस्तर
त्यामुळे येत्या ५ वर्षात देशातील प्रत्येक पंचायतीमध्ये दुग्धव्यवसाय करण्याचा निर्णय घेतलाय या योजनेबद्दल जर तुम्हाला अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही पशूपालक स्टार्टअप इंडिया आणि नाबार्डच्या अधिकृत वेबसाइटला (website) भेट देऊ शकता.
cup syrup: कफ सिरपमुळे लहान मुले दगावली, राज्य सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय!