
NCP MLA Disqualification । मागील वर्षी अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सर्वात मोठी फूट पाडून उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पक्षात फूट पडूनही आजही अनेक पदाधिकारी अजित पवार गटात सहभागी होत आहेत. खरी राष्ट्रवादी कोणाची? यावर अजून निर्णय झाला नाही. सध्या याप्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्यासमोर सुनावणी सुरु आहे. (Latest marathi news)
आज याप्रकरणी सर्वोच्च न्यायालायने (Supreme Court) महत्त्वाचा निर्णय दिला आहे. दरम्यान, राहुल नार्वेकर यांचे वकील सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी तीन आठड्यांचा वेळ मागितला होता. वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी याला कडाडून विरोध केला. वेळ वाढवून मागणं हे नेहमीच होत असल्याने नार्वेकर यांना केवळ एकच आठवड्याची मुदत द्यावी असं मनु सिंघवी म्हणाले. (Supreme Court Order)
Ind vs Eng । भारतीय संघाच्या अडचणी वाढल्या, ‘हा’ स्टार खेळाडू संघाबाहेर
सुनावणीदरम्यान, सर्वोच्च न्यायालायने नार्वेकरांना दोन आठवड्यांची मुदत वाढवून दिली आहे. न्यायालयाने नार्वेकर यांना राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी निर्णय देण्यासाठी 15 फेब्रुवारीपर्यंतची मुदत दिली आहे. जरी वेळ थोडा वाटत असला, तरी याप्रकरणी निवडणूक आयोग काय निकाल देणार हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे.