रत्नागिरी रिफायनरी बाबत घेण्यात आले महत्त्वाचे निर्णय! उदय सामंत यांनी घेतली महत्त्वाची बैठक

Important decisions were taken regarding Ratnagiri Refinery! An important meeting was held by Uday Samant

राज्यात सध्या रत्नागिरी रिफायनरी प्रकल्पाला विरोध दर्शविला जात आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर मधील बारसू येथे हा रिफायनरी प्रकल्प प्रस्तावित आहे. या प्रकल्पासाठी बारसू येथे सध्या माती परिक्षण सुरू आहे. लवकरच हे माती परीक्षण संपेल. परंतु, याठिकाणी स्थानिकांनी आक्रमक भूमिका घेत आंदोलन केले आहे. रत्नागिरीमध्ये रिफायनरी प्रकल्प ( Barsu Refinary Project) होऊ नये यासाठी राजकीय वर्तुळातून सुद्धा विरोध केला जात आहे.

चोरी करताना पाहिले म्हणून महिलेची हत्या; धारधार हत्याराने वार करून विहरीत ढकलून दिले…

या पार्श्वभूमीवर उद्योगमंत्री उदय सामंत ( Uday Samant) यांनी आज महत्त्वाची बैठक घेतली आहे. या बैठकीसाठी रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघाचे खासदार विनायक राऊत, राष्ट्रवादीचे नेते अजित यशवंत उपस्थित होते. या बैठकीमध्ये काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. रत्नागिरी मधील आंदोलन कर्त्यांवर ३५३ सारखे गुन्हे लावण्यात येणार नाहीत. तसेच याबाबत लवकरच मुंबई (Mumbai) येथे विस्तारित बैठक होणार आहे.

calls : कॉल्स आणि SMS मध्ये होणार हे बदल, १ मे पासून येणार नवीन नियम…

रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आम्हाला त्रास द्यायचा नाहीय. इथल्या मातीचं परिक्षण झाल्यानंतर प्रकल्प येणार की नाही येणार यावर शिक्कमोर्तब केले जाणार आहे. याबाबत अत्यंत संयमाने आज चर्चा झाली आहे. आम्हाला हा प्रकल्प फक्त रेटून पुढे न्यायचा नाही. सगळ्यांचं समाधान करून, शेतकऱ्यांना न्याय देऊन हा प्रकल्प पुढे न्यायचा आहे. असे आश्वासन उदय सामंत यांनी दिले आहे.

गौतमी पाटील कोणासमोरही नाचेल तुला काय त्रास आहे? अजित पवारांचा मिश्किल टोमणा!

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *