आपण पाहतो ग्रामीण भागातील शेतकरी शेतीसह (agriculture) अजून नफा मिळावा यासाठी जोडव्यवसाय करत असतात. मग यामध्ये शेळीपालन असो, कुक्कुटपालन (Poultry farming )असो. या व्यवसायातून ते पैसे मिळवत असतात. दरम्यान कुक्कुटपालन हा व्यवसाय प्रत्येक शेतकऱ्याच्या (farmers) घरी केला जातो. या व्यवसायातून शेतकरी अंडी व्यवसाय (Egg business) करून चांगला पैसा कमवू शकतात.
अरे वा भारीच की! ‘या’ जिल्ह्यात गवती चहाच्या शेतीचा 250 एकरवर यशस्वी प्रयोग
दरम्यान आता आपण अशाच भरपूर अंडी देणाऱ्या कोंबडी विषयी माहिती पाहूया जी तुम्हाला चांगला नफा देऊ शकते. प्लायमाउथ रॉक या कोंबडीमध्ये एका वर्षात जवळपास 270 अंडी घालण्याची क्षमता आहे. ही कोंबडी शेतकऱ्यांना चांगला नफा देऊ शकते. या कोंबडीला अमेरिकन जात मानली जाते. या कोंबडीच्या एका अंड्याचे जवळपास वजन 60 ग्रॅम पर्यंत असते. तसेच या कोंबडीचे 3 किलोग्रॅमपर्यंत वजन आहे. खरतर या कोंबडीची चोच पिवळी आणि कान लाल असतात.
Shivsena: शिवसेनेच धनुष्यबाण कुणाचं? आज सुप्रीम कोर्टात होणार सुनावणी
प्लायमाउथ रॉक चिकन भारतातील प्रत्येक राज्यात पाहायला मिळेल. ज्याला रॉक बॅरेड रॉक (Rock Barred Rock) असेही म्हणतात. महत्वाचं म्हणजे या कोंबडीचे मांस अतिशय चवदार लागत असून तेआरोग्याच्या दृष्टीने अतिशय फायदेशीर मानले जाते. म्हणून बाजारात या कोंबडीच्या मांसाची किंमत खूप जास्त आहे.
Alia-Ranbir: “आलीया रात्रभर बेडवर…”, रणबीर कपूरने केला आलियाच्या ‘या’ सवयीचा खुलासा