Shiv Sena MLA Disqualification Case । मुंबई : राज्याच्या सत्तासंघर्षाचा पेच अजूनही सुटला नाही. सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) शिवसेना आमदार (Shiv Sena MLA) अपात्रतेबाबतचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्याकडे सोपवला आहे. दरम्यान, आज राहुल नार्वेकर यांच्यासमोर दुसऱ्यांदा प्रत्यक्ष सुनावणी पार पडली. सुनावणीवेळी शिंदे आणि ठाकरे गटाकडून जोरदार युक्तिवाद केला. (Latest Marathi News)
ही सुनावणी विधान भवनाच्या (Vidhan Bhawan) सेंट्रल हॉलमध्ये पार पडली. या प्रकरणी पुढील एक ते दोन आठवड्यात निकाल लागेल अशा चर्चांना उधाण आले होते. परंतु आता या प्रकरणाची पुढील सुनावणी 13 ऑक्टोबरला होणार अशी माहिती समोर आली आहे. संपूर्ण प्रक्रियेला कमीत कमी 3 महिन्यांचा कालावधी लागू शकतो. पुढच्या वर्षी हा निकाल लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Ajit Pawar । राष्ट्रवादी कोणाची? अजित पवार स्पष्टच बोलले, म्हणाले; “निवडणूक आयोग…”
या दोन्ही गटाकडून पक्षाची महत्त्वाची कागदपत्रे आणि घटना जमा केली असून त्यांची पडताळणी करणं, आमदारांची साक्ष नोंदवणं तसेच उलट तपासणी करणं या संपूर्ण प्रक्रियेला तीन महिन्यांचा कालावधी लागेल. त्यामुळे प्रत्यक्ष सुनावनीनंतर तातडीने निर्णय देणार नाही. तसेच डिसेंबर महिन्यात विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन देखील पार पडणार आहे.
Tomato Subsidy । टोमॅटोला अनुदान जाहीर करा! शेतकऱ्यांची मोठी मागणी