Mumbai Police Bharti । मुंबई : मुंबई पोलीस (Mumbai Police) दलामध्ये तीन हजार पोलिसांची कंत्राटी पद्धतीने भरती करण्यात येणार अशी चर्चा सुरु होती. दरम्यान, ही भरती ११ महिन्यांसाठी असणार असे सांगण्यात येत होते. त्यामुळे पोलीस भरती (Police Bharti) करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले होते. परंतु यावर आता गृहखात्याकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. (Latest Marathi News)
Onion Rate । कांद्याचा पुन्हा वांदा.. ठेवला तर सडतोय अन् विकला तर भाव नाही
ही पोलीस भरती कुठल्याही परिस्थितीत कंत्राटी स्वरुपाची नाही. पोलीस भरती करुन नियमित पोलीस होईपर्यंत मुंबईची (Mumbai) कायदा आणि सुव्यवस्था वार्यावर सोडता येणार नाही. याच पार्श्वभूमीवर राज्य सुरक्षा महामंडळाकडून एकूण 3000 मनुष्यबळ भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महत्त्वाचे म्हणजे हा निर्णय नियमित पोलिस उपलब्ध होत नाही, तोपर्यंतसाठी असणार आहे, असे स्पष्टीकरण गृहखात्याने दिले आहे.
धक्कादायक! राज्यातील 3500 गावे संपर्काविनाच, नाहीत ‘या’ सुविधा
दरम्यान, याच मुद्द्यावरून विधिमंडळात तीव्र पडसाद उमटले होते. विधिमंडळ अधिवेशनात (Legislative sessions) विरोधकांनी राज्यातील सरकारवर चांगलाच निशाणा साधला. त्यानंतर आता गृह विभागातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांकडून याबाबतचे वृत्त फेटाळून लावण्यात आले आहे.