
दिवसेंदिवस तंत्रज्ञानात प्रगती होत आहे. आज जवळजवळ प्रत्येक क्षेत्रात तंत्रज्ञान वापरले जात आहे. कृषी क्षेत्र देखील आता प्रगत झाले असून शेतकरी शेतीच्या कामासाठी ड्रोनचा वापर करू लागले आहेत. ड्रोनमुळे कमी खर्चात, कमी वेळात आणि कमी कष्टात शेतात कामे करता येत आहेत. दरम्यान केंद्र सरकारने ( central government) ड्रोनच्या मदतीने शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी कृषी ड्रोन सबसिडी योजना सुरू केली आहे.
मोठी बातमी! आमदार जयकुमार गोरे यांचा भीषण अपघात
याआधी शेतकरी फक्त 10 बिघे पीक करू शकत होते. परंतु, ड्रोनच्या मदतीने तेवढ्याच वेळेत आता 50 ते 100 बिघा जमीन पीक घेता येते. ड्रोन हे तांत्रिकदृष्ट्या शेतकऱ्यांना मदत करते. यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेत ड्रोनच्या सहाय्याने शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी कृषी ड्रोन सबसिडी ( Drone Subcidy) योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत केंद्र सरकार शेतकऱ्यांना 5 लाख रुपयांपर्यंतच्या ड्रोनच्या खरेदीवर 50 टक्क्यांपर्यंत सबसिडी देणार आहे.
आमदार जयकुमार गोरे यांच्या अपघातावर शरद पवारांनी दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून ड्रोनच्या प्रशिक्षणासाठी विविध राज्यात केंद्रे उभारण्यात आली आहेत. यामध्ये महाराष्ट्रात चार ठिकाणी शाळा सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. यासाठी ऑनलाइन नोंदणी करावी लागणार असून नोंदणीसाठी संकेतस्थळे देखील देण्यात आली आहेत.
आनंदाची बातमी ! 30 हजार शिक्षकांची शिक्षक भरती होणार
Advantages | कृषी ड्रोनचे फायदे
1) कृषी ड्रोन तण, संक्रमण आणि कीटकांमुळे प्रभावित झालेल्या क्षेत्रांची माहिती गोळा करतात.
2) खते, कीटकनाशके यांच्या फवारणीसाठी कृषी ड्रोन फायदेशीर ठरते.
3) पीक नुकसान तपासण्यासाठी ड्रोनची मदत होते.
फिनोलेक्स कंपनीची कौतुकास्पद कामगिरी; शेतकऱ्यांसोबत साजरा केला राष्ट्रीय किसान दिवस