शेतकरी आर्थिक दृष्ट्या मजबूत व्हावा यासाठी सरकार (Goverment) वेगेवेगळ्या योजना राबवत असते. आता अशीच एक शेतकऱ्यांसाठी फायदेशीर योजना राबवली जात आहे. आता महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत सिंचन विहिरींबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये शेतकऱ्यांना दोन विहिरींतील अंतराची अट शिथिल करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही एक दिलासादायक बाब आहे.
त्याचबरोबर यासाठी ३ लाखांवरून चार लाख रुपये रक्कम मंजूर करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना आता एका गावात कितीही विहिरी घेता येणार आहेत. याचा लाभ सर्व शेतकऱ्यांना घेता येणार आहे. सिंचन क्षेत्र वाढावे यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार (Mahatma Gandhi National Rural Employment) हमी योजने अंतर्गत सिंचन विहिरींची कामे केली जातात.
धक्कादायक! कपडे धुण्यासाठी गेलेल्या दोन बहिणींचा तलावात बुडून मृत्यू
शेतकरी (Farmer) कुटुंबाला चार पैसे मिळावे या उद्देशाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहिरींची कामे पूर्ण करण्यासाठी राज्य सरकार काम करत आहे. या योजनेचा लाभ, अनुसूचित जाती, भटक्या-विमुक्त जाती, दारिद्र्यरेषेखालील लाभार्थी, इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी, जमीन सुधारणांचे लाभार्थी, अल्पभूधारक त्याचबरोबर याव्यतिरिक्त अन्य शेतकरी देखील याचा लाभ घेऊ शकतात.
मोठी बातमी! कुत्र्याने सार्वजनिक ठिकाणी घाण केल्यास मालकाला ५०० रुपये दंड