कर्जदारांसाठी महत्वाची बातमी! SBI ने वाढवले ​​व्याजदर

Important news for borrowers! SBI hikes interest rates

भारतीय स्टेट बँक ही भारतातील सर्वात मोठी आणि विश्वसनिय बँक म्हणून ओळखली जाते. या बँकेचे ग्राहक देशभरात आहेत. मात्र या बँकेचे गृहकर्ज आता महागले आहे. मागील एका वर्षाच्या कालावधीमध्ये एसबीआयमध्ये MCLR ०.१० टक्क्यांनी वाढविण्यात आला आहे. इतकंच नाही तर इतर अनेक कर्जावरील व्याजदर सुद्धा एसबीआय कडून वाढविण्यात आले आहेत. संक्रांतीच्या मुहूर्तावर कालपासून ( दि.15) हे नवीन दर लागू झाले आहेत.

सचिन तेंडुलकरने बनवले तिळगुळ; व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना दिल्या अनोख्या शुभेच्छा

एसबीआयने आपल्या अधिकृत संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार 15 जानेवारीपासून एक वर्षाचा MCLR वाढला असून तो तो ८.४ टक्के झाला आहे. याआधी तो ८.३० टक्के इतका होता. याशिवाय, इतर मुदतीसाठी MCLR मध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. दरम्यान सध्या एसबीआयकडून गृहकर्जावर विविध सवलती देत आहे. सणासुदीच्या ऑफर मोहिमेअंतर्गत ही ऑफर असून येत्या ३१ जानेवारी २०२३ पर्यंत ही ऑफर असणार आहे.

अन् स्टेजवरच देवेंद्र फडणवीस यांना भावना झाल्या अनावर; जुन्या आठवणी सांगताना कोसळले रडू

या ऑफर मध्ये बँकेकडून गृहकर्ज श्रेणींमध्ये ०.१५ ते ०.३० टक्के सूट देण्यात येत आहे. SBI च्या गृहकर्जाचे दर कर्जदाराच्या सिबील स्कोअर ( CIBIL Score ) वर अवलंबून असतात. कर्जदाराच्या क्रेडिट स्कोअर जितका चांगला तितका गृहकर्जाचा व्याजदर कमी असतो. तसेच कमी क्रेडिट स्कोअर असल्यास जास्त व्याजदर असतो.

पतंगामागे धावणाऱ्या बालकाचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू; ऐन सणात काळाने घातला घाला

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *