Agriculture News । शेतकरी बांधवांसाठी महत्वाची बातमी! गोगलगाय नियंत्रणासाठी करा ‘हा’ उपाय; होईल फायदा

Important news for farmers! Do 'this' remedy for snail control; It will be beneficial

Agriculture News । उस्मानाबाद : यंदा राज्याच्या काही भागात जोरदार पाऊस (Heavy Rain) झाला आहे, यामुळे ठिकठिकाणी पेरण्यांची लगबग सुरु आहे. सध्या आर्द्रतायुक्त जास्त काळ ओलावा असणारे वातावरण राहत असल्याने राज्यात गोगलगायीची (Snail) संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यांच्यामुळे पिकांचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. (Latest Marathi News)

Viral Video On Social Media । डिलिव्हरी बॉयने केले संतापजनक कृत्य, व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी व्यक्त केला संताप; म्हणाले, “यावर कारवाई…”

गोगलगायीची संख्या वाढत चालल्याने शेतकऱ्यांचे टेन्शन वाढत आहे. परंतु यावर आता कृषी विभागाकडून (Department of Agriculture) एक सल्ला देण्यात आला आहे. गोगलगायींचा प्रादुर्भाव (Infestation of snails) कमी व्हावा यासाठी शेतकऱ्यांनी पिकामध्ये कोळपणी करणे गरजेचे आहे. जर तुम्ही असे केले तर तण नियंत्रणात राहील आणि गोगलगायींची अंडी नाहीशी होतील.

Sunny Deol । फक्त डिंपल कपाडिया नाही तर, ‘या’ चार लोकप्रिय अभिनेत्रींसोबत होते सनी देओलचे प्रेमसंबंध

त्याशिवाय फळझाडाच्या खोडाला 10 टक्के बोर्डोपेस्ट लावली तर गोगलगायी झाडावर चढत नाहीत. इतकेच नाही तर शेताच्या बांधाच्या शेजारी दोन्ही बाजूने 1 ते 2 फुटाचे चर काढावी. सायंकाळी,सुर्योदयापूर्वी बाहेर आलेल्या आणि झाडावर लपलेल्या गोगलगायी हाताने एकत्र करुन त्यांना साबणाच्या द्रावणात बुडवाव्या.

Nana Patole । “…तर मी मुख्यमंत्री होण्याची इच्छा लवकर पूर्ण व्हावी” नाना पटोले यांचे मोठे वक्तव्य

त्यांना एका खड्डा करून त्या खड्ड्यामध्ये पुरुन टाकाव्यात किंवा रॉकेल मिश्रित पाण्यामध्ये बुडवाव्यात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे गोगलगायी आकर्षित होण्यासाठी गोणपाट गुळाच्या पाण्याच्या द्रावणात बुडवून ते सायंकाळी शेतात वेगवेगळ्या ठिकाणी ठेवावेत. त्यानंतर पोत्याखाली गोळा झालेल्या गोगलगायी नष्ट कराव्या.

Pune Metro । पुणेकरांचा मेट्रोला उत्तम प्रतिसाद! एकाच दिवसात सर्वाधिक प्रवाशांनी केला मेट्रो मधून प्रवास

Spread the love