
मुंबई : शेतकऱ्यासाठी एक अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे. नुकताच सरकारने शेततळेबाबद एक दिलासादायक निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार शासनाने शेततळे बांधण्यासाठी शेतकऱ्यांना 75 हजार रुपयांपर्यंत चे अनुदान देण्यास मान्यता दिली आहे. याचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार आहे. पाणीटंचाईच्या काळात शेततळे महत्वाची भूमिका बजावत असतात. त्यामुळेच सरकारनं हा निर्णय घेतल्याचे समजते आहे. या अनुदानाचे मुख्य कारण असे सांगितल्या जातेय की, शेतातील तळ्यात पाण्याचा सुरक्षित साठा उपलब्ध होत असल्यानं हे साठवलेले पाणी झिरपून जाऊ नये, तसेच टंचाईच्या काळात फळबागावाचविण्यासाठी या पाण्याचा वापर व्हावा या हेतूने अनुदान दिले जाणार आहे.
सरकारच्या म्हणण्यानुसार शेततळे बांधण्यासाठी ५० टक्क्यांपर्यंत अनुदान देण्याचा प्रस्ताव आला होता. त्यानुसार २८ हजारांपासून ते ७५ हजार रुपयांपर्यंत तळ्याच्या आकारानुसार शेततळे बांधण्यासाठी अनुदान दिले जाणार आहे. योजनांचा लाभ घेण्यासाठी mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर शेतकरी थेट ऑनलाइन अर्ज (Online application) करू शकतात. योजनांबाबत माहिती हवी असल्यास कोणत्याही कृषी सहायक, पर्यवेक्षक किंवा कृषी कार्यालयाशी तुम्ही संपर्क करू शकता. तळ्याच्या आकारानुसार अनुदानाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात वर्ग करण्यात येणार आहे.
Cotton: शेतकऱ्यांना बाप्पा पावला ; धरणगावच्या जिनिंगमध्ये कापसाला मिळाला उच्चांकी 11,153 रु.चा भाव
खालीलप्रमाणे अनुदानाचे वाटप होणार आहे
१५ × १५ × ३ मीटरच्या अस्तरीकरणासाठी २८,२७५ रुपये
२० × १५ × ३ मीटरसाठी ३१,५९८ रुपये
२० × २० × ३ मीटरसाठी ४१,२१८ रुपये
२५ × २० × ३ मीटरसाठी ४९,६७१ रुपये
२५ × २५ × ३ मीटरसाठी ५८,७०० रुपये
३० × २५ × ३ मीटरसाठी ६७,७२८ रुपये
३० × ३० × ३ मीटरसाठी ७५ हजार रुपये.
यानुसार , फलोत्पादन क्षेत्रासाठी पावणेदोन लाख रुपये अनुदान विशेष म्हणजे सामूहिक शेततळ्यासाठी १०० टक्के अनुदान मिळेल. ३४ × ३४ × ४.७० मीटर आकारमान असलेल्या सामूहिक शेततळ्यावर जर दोन ते ५ हेक्टरपर्यंत किंवा त्यापेक्षा जादा फलोत्पादन क्षेत्र असल्यास त्यासाठी तीन लाख ३९ हजार रुपयांपर्यंत अनुदान मिळेल. मात्र फलोत्पादन क्षेत्र एक ते दोन हेक्टरच्या दरम्यान असल्यास २४ × २४ × ४ मीटर आकारमानाच्या शेततळ्यासाठी पावणेदोन लाख रुपये अनुदान दिले जाणार आहे. म्हणजे जवळपास 2 लाखांपर्यंत अनुदान दिले जाणार आहे.