
पुणेकरांसाठी सध्या एक महत्वाची बातमी समोर आली आहे. चांदणी चौकातील (Chandni Chowk) पुलाचे जवळपास 90 टक्के काम पूर्ण झाले आहे. पुण्यातील (Pune) चांदणी चौकातील उड्डाण पुलाचे उद्घाटन 1 मे रोजी होणार आहे. त्यामुळे 15 ते 20 एप्रिल दरम्यान गर्डर टाकण्याचे काम होणार सुरू होणार आहे. त्यामुळे चांदणी चौकातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
Gold Rate: ऐन लग्नसराईत सोन्याचे भाव वाढले
चांदणी चौकातील वाहतूक (Traffic at Chandni Chowk) दोन दिवस बंद असल्यामुळे प्रवाशांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे. चांदणी चौकातून दुसरीकडे जाणाऱ्या सर्विस रोडची कामं पूर्ण झाली आहेत. त्या मार्गाचा वापर प्रवाशांना करावा लागणार आहे.
“एक्स गर्लफ्रेंड पाहून जळत असेल” आकाश ठोसरच मोठ वक्तव्य
दरम्यान, 1 मे रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते मुख्य पुलाचं उद्घाटन होणार आहे. आता या पुलामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होणार नाही.