कसबा आणि चिंचवडच्या (Kasba and Chinchwad) पोटनिवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. भाजपकडून कसबा मतदार संघासाठी हेमंत रासने (Hemant Raasne) तर चिंचवड मतदार संघासाठी लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांच्या पत्नी अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.
आता हेमंत रासने याना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजपच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक (Shailesh Tilak) यांनी नाराजी व्यक्त केली आहे. यावेळी बोलताना शैलेश टिळक म्हणाले, आम्ही पक्षाकडे तिकीटाची मागणीही केली होती. कुटुंबातील सदस्याला उमेदवारी मिळेल अशी आशा आम्हाला होती. मात्र तिकीट देण्यात आलं नाही. अशी प्रतिक्रिया शैलेश टिळक यांनी दिली आहे.
उमेदवारी जाहीर होताच हेमंत रासने दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाला पोहचले!
ही प्रतिक्रिया देताना शैलेश टिळक भावुक झाल्याचे दिसून आले. त्याचबरोबर मुक्ता टिळक यांच्या आजारपणातील कामावर अन्याय झाला, असं देखील ते यावेळी म्हणाले आहेत. तसेच आम्ही पक्षासोबतच राहू, असं त्यांनी स्पष्ट केलय. एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
कसबा-चिंचवड पोटनिवडणुकांसाठी टिळक कुटुंबाला उमेदवारी देणं का डावललं? चंद्रकांत पाटील म्हणाले…