
दिल्ली : आतापर्यंत दिल्लीमध्ये (Delhi) डेंग्यूचे १७० पेक्षा जास्त रुग्ण आढळून आले आहेत. महापालिकेने सोमवारी ही आकडेवारी जाहीर केली. दिल्ली महानगरपालिकेच्या माहितीनुसार, दिल्लीत जानेवारीमध्ये डेंग्यूचे २३, फेब्रुवारीमध्ये १६, मार्चमध्ये २२, एप्रिलमध्ये २०, मेमध्ये ३० आणि जूनमध्ये ३२ रुग्ण आढळले.
माहितीनुसार, 6 ऑगस्टपर्यंत देशाच्या राजधानीत 174 जणांना डेंग्यूची (Dengue) लागण झाली होती. महामंडळाच्या म्हणण्यानुसार, 30 जुलैपर्यंत येथे डेंग्यूचे 169 रुग्ण आढळून आले असून आठवडाभरात आणखी पाच नवीन रुग्ण आढळून आले आहेत. MCD च्या म्हणण्यानुसार, यावर्षी या आजारामुळे आतापर्यंत एकाचाही मृत्यू झाला नाही.
गेल्या वर्षी 1 जानेवारी ते 30 जुलै या कालावधीमध्ये डेंग्यूचे 55 रुग्ण आढळले होते. अहवालानुसार, या वर्षी आतापर्यंत मलेरियाचे ३५ आणि चिकुनगुनियाचे नऊ रुग्ण आढळून आले आहेत.