शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर हे सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे नाही. अशी टीका मोठ्या प्रमाणात झाली होती. परंतु, मागील काही दिवसांपासून शिंदे- फडणवीस सरकारने शेतकऱ्यांच्या हिताच्या निर्णयांचा धडाका लावला आहे. या काळात त्यांनी एकापाठोपाठ एक शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले आहे. यामध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्या, थकीत वीजबिलाला स्थगिती, वीज निर्मिती साठी सौरप्रकल्प यांसारख्या निर्णयांचा समावेश होतो. दरम्यान, नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत शिंदे फडणवीस सरकारने जलयुक्त शिवार (Jalyukt Shiwar) ही योजना नव्याने सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
बिहारमध्ये आहे चक्क आयआयटीयन्सचे गाव! इथल्या तरुण पोरांची ‘ही’ कमाल नक्की वाचा
राज्यातील गावे ( Villages) अधिक समृद्ध करण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला असून याला जलयुक्त शिवार 2.0 असे नाव देण्यात आले आहे. 2014 साली भाजप-शिवसेना युती सरकार स्थापन झाल्यानंतर हे अभियान सुरू करण्यात आले होते. देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वाकांक्षी योजना अशी या प्रकल्पाची ओळख करून देण्यात आली होती. मात्र महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर हे अभियान बंद पाडण्यात आले होते.
धक्कदायक! श्रीगोंद्यातील तरुणीची सासरच्या लोकांकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून आत्महत्या
यामध्ये झालेल्या गैरप्रकारांची चौकशी सध्या सुरू आहे. सरकारच्या या नवीन निर्णयाने जलयुक्त शिवार अभियानाला संजीवनी मिळणार आहे. याशिवाय नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत जलयुक्त शिवार अभियाना व्यतिरिक्त ग्रामीण भागासाठी सुविधा संपन्न कुटुंब मिशन, सार्वजनिक ग्रंथालयांना अनुदान वाढ, पुण्यातील आंबेगावमध्ये शिवसृष्टी उभारणीला निधी देण्यासह इतर निर्णय घेण्यात आले आहेत.