पीएम किसान योजनेसंदर्भात महत्त्वाची सूचना! वाचा सविस्तर

Important notice regarding PM Kisan Yojana! Read in detail

मुंबई : केंद्र सरकार शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य मिळावे म्हणून अनेक योजना राबवत असते. जसे की, प्रधानमंत्री रोजगार योजना, उज्वला योजना, प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना, पीएम किसान योजना अशा अनेक वेगवेगळ्या योजना राबवत असते. आता शेतकऱ्यांसाठी पीएम किसान योजनेबाबत एक महत्वपूर्ण माहिती समोर येत आहे. e-KYC करण्याची मुदत ३१ ऑगस्ट, २०२२ पर्यंत आहे.

पी. एम. किसान सन्मान निधी योजनेतील लाभार्थ्यांना कळविण्यात येते की, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पी.एम किसान) पोर्टलवरील नोंदणीकृत पात्र लाभार्थ्यांची e-KYC करण्यासाठी यापूर्वी विशेष जनजागृती मोहिम राबविण्यात आली आहे. सदर बाबत सर्व पात्र लाभार्थ्यांना E-KYC करण्यासाठी OTP किंवा बायोमेट्रिक हे पर्याय उपलब्ध करुन देण्यात आले.

T Raja Singh : भाजप आमदार राजा सिंह यांनी पैगंबरांवर केलेल्या वक्तव्याप्रकरणी सुटका

प्रधानमंत्री किसान सम्मान निधी www.pmkisan.gov.in या वेबसाईट वरील Farmer Corner या टॅबमध्ये किंवा पी.एम. किसान APP व्दारे ओटीपी लाभार्थ्यांना स्वतः e-KYC प्रमाणीकरण मोफत करता येईल.

ग्राहक सेवा केंद्र केंद्रावर e-KYC प्रमाणीकरण बायोमॅट्रीक पध्दतीने करता येईल.

त्याचबरोबर केंद्र शासनाकडून ग्राहक सेवा केंद्रावर बायोमेट्रीक पध्दतीने e-KYC प्रमाणीकरण करण्यासाठी प्रती लाभार्थी बायोमेट्रिक प्रमाणीकरण दर रुपये १५ रुपये निश्चित करण्यात आला आहे.

Ajit Pawar: “अरे आत्ता होते काय, तिथं बसायला पाहिजे,”विधानसभा अधिवेशनात अजित पवार संतापले

सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना पुढील लाभ प्राप्त होण्यासाठी e-KYC प्रमाणीकरणाची प्रक्रिया दिनांक ३१/०८/२०२२ पर्यंत करण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे. सदर मुदतीत e-KYC प्रमाणिकरण प्रक्रिया पूर्ण न करणाऱ्या पात्र लाभार्थ्यांना पी.एम किसान सन्मान निधीच्या पुढील हत्याचा लाभ दिला जाणार नाही.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *