Santosh Deshmukh Murder case । सर्वात मोठी बातमी! बीड संतोष देशमुख हत्या प्रकरणी देवेंद्र फडणवीसांचे महत्त्वाचे आदेश

Devendr fadanvis

Santosh Deshmukh Murder case । बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येने राज्यभरात खळबळ माजवली आहे. या हत्येचा निषेध करण्यासाठी बीडमधील सर्वपक्षीय नेत्यांनी आक्रोश मोर्चा काढला आणि “वाल्मिकी कराडला अटक करा, धनंजय मुंडे राजीनामा द्या” अशी मागणी केली. या घटनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचे आदेश दिले आहेत. (Santosh Deshmukh Murder case)

Prajkta Mali । प्राजक्ता माळींनी सुरेश धसांना सुनावलं, म्हटलं- “महिलांची अब्रू उडवणं योग्य नाही”

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सीआयडीला निर्देश दिले आहेत की, बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपींची संपत्ती तातडीने जप्त केली जावी. तसेच, सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या बंदुकीसह फोटो आणि व्हिडीओ बाबत कडक कारवाई केली जावी. ज्यांच्याकडे बंदूक असून फोटो काढले गेले आहेत, त्यांच्या परवाने तातडीने रद्द करण्यात यावेत, असे निर्देश त्यांनी दिले आहेत. यासोबतच, बंदुकीचे परवाने दिले गेले असल्यास त्यांचा फेरआढावा घेतला जावा.

Rain Update । सावधान, महाराष्ट्रावर मोठे संकट! या’ ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता!

या आदेशानंतर, बीड जिल्ह्यातील काही तरुणांच्या बंदुकीसह फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पसरले आहेत. या प्रकरणावर नियंत्रण मिळवण्यासाठी सीआयडीने कडक कारवाई सुरू केली आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपींची अटक झालेली नाही, त्यामुळे वातावरण ताणलेले आहे. यावर राजीनामा मागण्यासाठी मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात आक्रमक आंदोलन सुरू झाले आहे.

Dr. Manmohan Singh । माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, संपूर्ण देशात 7 दिवसांचा दुखवटा

Spread the love