
Maharashtra Politics । निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्ष तयारीला लागले आहेत. (Loksabha election 2024) निवडणूक आयोग कधीही लोकसभा निवडणूक जाहीर करू शकते. दरम्यान, मागील काही महिन्यांपासून केंद्रीय मंत्र्यांचे महाराष्ट्र दौरे खूप वाढले आहेत. नुकतीच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी छत्रपती संभाजीनगर शहरात मोठी सभा घेतली. यावेळी त्यांनी विरोधकांवर मोठा निशाणा साधला. (Imtiaz Jalil vs Amit Shah)
“निजामाला घरी पाठवा, असे म्हणत ‘मजलीस को संभाजीनगर से उखाड फेको”, असं आवाहन अमित शहा यांनी मतदारांना केलं. यावरून एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांनी त्यावरून प्रत्युत्तर दिले आहे. “औरंगाबाद लोकसभेची जागा भाजपला मिळावी, यासाठी अमित शहा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना दमदाटी करून खाली बसवलं, असा खळबळजनक दावा जलील यांनी केला आहे.
Ajit Pawar । सुप्रिया सुळे यांच्या डोळ्यात पाणी, व्हिडिओ पाहून काय म्हणाले अजितदादा?
“सत्तेसाठी तुमचा पक्ष किती खालच्या पातळीवर गेला आहे हे सर्वांना माहिती आहे. ज्या लोकांच्या राजीनाम्यासाठी तुम्ही लढत होता, मागणी करत होता. ते लोक आज तुमच्या रांगेत बसले आहेत. तुम्हाला 48 पैकी 45 जागा पाहिजे, मग तुम्ही 3 कशाला सोडता? तुम्हाला माहित आहे त्यातली एक जागा माझी आहे,” असा टोला देखील जलील यांनी लगावला आहे.