शुल्लक कारणावरून पती-पत्नीत (Husband and wife) कायम भांडण होत असतात. परंतु कधी कधी हेच भांडण कधी टोकाला जाईल हे काही सांगता येत नाही. अशीच काहीशी घटना घडली आहे. पत्नीने जेवण तयार केले नाही त्यामुळे रागाच्या भरात पतीने पत्नीला एका खोलीत कोंडून ठेवले आणि स्वतः आत्महत्या केली आहे. अहताशाम असे मृताचे नाव आहे. (Latest Marathi News)
विठ्ठलाच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला, भीषण अपघातात एक जागीच ठार तर ६ जण जखमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोघांचे दोन वर्षांपूर्वी लग्न झाले होते. त्यांचा संसार सुरळीतही चालू होता. मात्र एके दिवशी पत्नीने दुपारच्या वेळी जेवण बनवले नाही. याच रागातून त्याने पत्नीला एका खोलीत डांबून ठेवले आणि स्वतःच आत्महत्या केली. सादर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला. (Crime News)
फडणवीसांच्या गौप्यस्फोटानंतर संजय राऊतांचे मोठे वक्तव्य; म्हणाले “तुमचा प्रयोग…”
ही धक्कदायक घटना हरियाणातील (Haryana) सोनीपत येथे घडली आहे. अहताशाम हा मूळचा उत्तर प्रदेश (MP) येथील रहिवासी होता. परंतु तो कामानिमित्त हरियाणातील सोनीपतमधील सेवली गावात पत्नीसह भाड्याच्या घरात राहत होता. दरम्यान अहताशामने जेवण न बनवल्याच्या रागातून आत्महत्या केली की दुसऱ्या कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली याचा शोध पोलीस घेत आहेत.
ठाकरे गट आणि शिंदे गट पुन्हा भिडले, पोलिसांकडून आंदोलनकर्ते ताब्यात