Site icon e लोकहित | Marathi News

Heavy Rain । क्षणात डोळ्यासमोरून वाहून गेलं सर्वकाही, मुसळधार पाऊस आणि ढगफुटीने जनजीवन विस्कळीत

In a moment, everything was washed away in front of the eyes, life was disrupted by heavy rains and cloud bursts

Heavy Rain । नागपूर : मागील अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांसह सर्वसामान्य पावसाची (Rain) आतुरतेने वाट पाहत आहेत. राज्याच्या काही जिल्ह्यांमध्ये पावसाची (Rain in Maharashtra) प्रतिक्षा कायम आहे. दरम्यान, राज्याच्या काही भागात पुन्हा एकदा पावसाचे जोरदार आगमन झाले आहे. अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाला (Heavy Rain in Maharashtra) सुरुवात झाली आहे. अशातच नागपूरमध्ये ढगफुटी झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. (Latest Marathi News)

Kirit Somaiya । किरीट सोमय्या व्हिडिओ प्रकरणी लोकशाही वृत्तवाहिनीला मोठा धक्का; पुढील ७२ तास प्रक्षेपण बंद ठेवण्याचे आदेश

नागपूरमध्ये मागील दोन दिवसांपासून रिमझिम पाऊस पडत होता. परंतु अचानक काल रात्री विजांच्या कडकडाटासह खूप पाऊस झाला. मुसळधार पावसाने अंबाझरी तलाव (Ambazari Lake) ओव्हरफ्लो होऊन पाणी शहरात शिरले आहे. त्यामुळे सीताबर्डी परिसराला नदीचे स्वरूप आले आहे. हे पाणी घरात शिरल्याने अनेकांचे संसार वाहून गेले आहेत. यात कोणाचे गॅस सिलिंडर वाहून गेलाय तर कोणाची भांडी अशी जीवनावश्यक वस्तू वाहून गेल्या आहेत. (Rain Lashes in Nagpur)

Government Hospital । शासकीय रूग्णालयात धक्कादायक प्रकार; पेशंटच्या खाटांवर कुत्रे करतायेत आराम

दरम्यान, या भागात अवघ्या 4 तासात 100 मिमीपेक्षा जास्त पाऊस पडल्याने शहरात आणीबाणीसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. बस स्टॉपमध्ये चार ते पाच फुटापर्यंत पाणी साचलं असून त्यात 8 ते 10 एसटी अडकल्या आहेत. त्यामुळे एसटी वाहक आणि चालकांनी एसटीच्या टपावर आश्रय घेतला. या ठिकाणी युद्धपातळीवर मदत कार्य सुरु आहे.

Ahmednagar Crime । अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर दरोडा प्रकरणात समोर आली धक्कादायक माहिती; नवऱ्याच्या हत्येसाठी बायकोनेच…

तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने मदतकार्य करण्याचे आदेश दिले आहेत. नागपूर जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त घटनास्थळी पोहोचले आहेत. सखल भागात अडकलेल्या नागरिकांना अगोदर मदत करण्यात यावी अशा सूचना दिल्या आहेत. त्याशिवाय एनडीआरएफची एक आणि एसडीआरएफच्या 2 टीम तैनात केल्या आहेत.

Rohit Pawar । मोठी बातमी! रोहित पवारांचा अजित पवार गटावर गंभीर आरोप; म्हणाले, “सही करा नाहीतर…”

Spread the love
Exit mobile version