राज्यात सध्या अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. राज्याच्या अनेक भागांमध्ये अवकाळी पावसासह गारपीठ देखील होत आहे. मोठ्या प्रमाणात विजांचा कडकडाट होत पाऊस पडत आहे. अनेक ठिकाणी विज पडून मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. वीज पडून माणसांचा आणि त्याचबरोबर जनावरांचा देखील मृत्यू झाला आहे.
दरम्यान, सध्या देखील वीज पडून एका महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील रामपूर येतील पुतळेवाडी परिसरात वीज अंगावर पडून महिलेचा मृत्यू झाला आहे. या घटनेने सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे. (A woman died after being electrocuted in Rampur Alay Putlewadi area of Sinnar taluka of Nashik)
गौतमीचा कार्यक्रम सुरु झाला अन् महिलांनी केलं असं कृत्य की सर्वजण पाहतच राहिले; पाहा Video
नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी अवकाळी पावसाने थैमान घातले. वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट होत या ठिकाणी मोठा पाऊस झाला. यावेळी सिन्नर तालुक्यातील एक महिला पावसामुळे कपडे काढण्यासाठी घराच्या बाहेर आली आणि त्याचवेळी तिच्या अंगावर वीज कोसळली आणि महिलेचा जागीच मृत्यू झाला.
ब्रेकिंग! जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर बस दरीत कोसळली, ८ जण जागीच ठार