सध्या शेतकरी ज्या पिकातून जास्त उत्पादन मिळेल अशा पिकांची लागवड करतात. मग यामध्ये पालेभाज्या तसेच फळभाज्यांची जास्त लागवड केली जाते. यामध्ये मग जर आपण शेवगा या पिकाचा विचार केला तर गेल्या काही वर्षापासून शेतकरी शेवग्याची लागवड व्यापारी तत्त्वावर मोठ्या प्रमाणावर करत आहेत. शेवग्याच्या लागवडीत महाराष्ट्राचा विचार केला तर सर्व ठिकाणी शेवग्याची लागवड उत्तम प्रकारे करता येते.
अरे हे काय घडलं? पोलिसांना दंड घेण्याऐवजी भरावा लागला भुर्दंड; वाचा पुण्यातील किस्सा
दरम्यान सगळ्यात महत्वाचे शेवगा पिकाचे वैशिष्ट्य म्हणजे मार्च ते मे या तीन महिन्यांमध्ये शेवगा पिकाला अजिबात पाणी पुरवठा केला नाही.तरीदेखील शेवग्याचे झाड जळून जात नाही किंवा शेवग्याचे उत्पादन सुद्धा घटत नाही. दुसरी महत्वाची बाब म्हणजे जर तुमच्याकडे पाण्याची सोय असेल तर शेवगा लागवडीच्या माध्यमातून तुम्ही जास्त उत्पन्न मिळवू तर शकताच पण हा उत्पन्नाचा एक चांगला स्त्रोत तुमच्यासाठी निर्माण होऊ शकतो. वर्षभर पाणी असेल अशा ठिकाणी नोव्हेंबर ते जून असे सात ते आठ महिने शेवगा शेंगांचे उत्पादन शेतकऱ्यांना मिळते. दरम्यान शेवग्याची लागवड करण्यासाठी महत्वाच्या अशा दोन जाती आहेत. ज्यातून जास्त उत्पादन मिळते.
राज्यात पावसाचा कहर, अनेक गोरगरिबांचे संसार उघड्यावर
शेवग्याच्या महत्वाच्या दोन जाती
1) जाफना – शेवग्याचा जाफना जातीचा वाण देशी शेवगा म्हणून देखील ओळखला जातो. तसेच या जाफना जातीच्या शेंगा खायला देखील खुप चविष्ट लागतात. या शेंगांच्या झाडावर एका देठावर एकच शेंग येते. तसेच ती शेंग 20 ते 30 सेंटिमीटर लांब असते. दरम्यान या जाफना जातीच्या शेवग्याच्या झाडाला वर्षातून फक्त फेब्रुवारीत फुले लागतात. यानंतर मार्च ते एप्रिल या कालावधीत शेंगांचे उत्पादन मिळते. या जातीच्या शेंगांचे एका किलोमध्ये 20 ते 22 शेंगा बसतात. तसेच एका झाडापासून 150 ते 200 शेंगांचे उत्पादन मिळते.
लग्नाच्या पहिल्याच दिवशी नवरीच कृत्य पाहून नवरा अजूनही शॉकमध्ये, कारण…
2) रोहित 1 – रोहित 1 या जातीची लागवड केल्यापासून अवघ्या सहा महिन्यात उत्पन्न सुरू होते. दरम्यान या जातीच्या शेंगांची लांबी 45 ते 55 सेंटिमीटर असते व शेंगा सरळ व गोलाकार असतात. तसेच या शेंगांचा रंग गर्द हिरवा असतो. या शेंगा चवीला अतिशय स्वादिष्ट असते. दरम्यान या जातीचे दुसरे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे इतर जातींपेक्षा 30 टक्के अधिक उत्पन्न मिळते. या वाणाचा कालावधी सात ते आठ वर्षाचा असून एका झाडापासून एका वर्षात सरासरी 15 ते 20 किलो शेंगा मिळतात व एक महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या जातीपासून 80% शेंगा या एक्सपोर्ट क्वालिटीच्या मिळतात.
थरारक घटना, पुराच्या पाण्यात कारसह बाप लेकीवर काळानं घाला घातला