Ajit Pawar । राज्यात सध्या निवडणुकीचे (Loksabha election) चांगलेच वारे वाहत आहे. लोकसभेच्या तोंडावर सर्व राजकीय पक्ष जोरात प्रचार करत आहेत. मागील वर्षी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये (NCP) मोठी फूट पाडली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत. अशातच आता अजित पवारांनी नवीन डाव टाकला आहे.
Maharashtra Politics । 84व्या वर्षी शरद पवारांनी पुन्हा फिरवली भाकरी, 3 मतदारसंघांची बदलली समीकरणे
बारामती मतदारसंघात यंदा अटीतटीची लढत पार पडणार आहे. कारण पहिल्यांदाच या मतदासंघात नणंद विरुद्ध भावजय असा हाय व्होल्टेज सामना रंगणार आहे. खासदार सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार (Supriya Sule Vs Sunetra Pawar) यांच्या लढतीत कोणाचा विजय होणार? याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. अशातच आता राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे.
Satara Lok Sabha । आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी! साताऱ्यात भाजपकडून उदयनराजेंना उमेदवारी
अजित पवार हे बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक रिंगणात उतरले आहेत का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी उमेदवारी अर्ज घेतल्याचं बोललं जात आहे. अजित पवारांच्या या खेळीमुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघ महत्त्वाचा असल्याने येथे दगा फटका होऊ नये यासाठी अजित पवार हे महायुतीचे डमी उमेदवार असणार आहेत.
Lok Sabha Election । धक्कादायक! पैशांचं आमिष देऊन महिलांना करायला लावला प्रचार पण पुढे घडलं वेगळंच..