बारामती : अनेक ठिकाणी आग लागल्याच्या घटना आपल्याला पाहायला मिळतात. अशीच एक घटना बारामती (Baramti) तालुक्यामध्ये घडली आहे, बारामती तालुक्यातील वाणेवाडीत वीजवाहक तारांच्या घर्षणाने शेतकऱ्यांचा ऊस जळाला आहे. शेतकऱ्यांचा जवळपास तीन एकर ऊस जळाला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
शिंदे-फडणवीस सरकार हे शेतकऱ्यांसाठीच; राज्यात लवकरच नैसर्गिक शेतीचे मॉडेल येणार!
शेतकऱ्यांचे जवळपास ३ लाखाचे नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच सोमेश्वरचे संचालक ऋषिकेश गायकवाड यांनी देखील या ठिकाणी भेट देत जळालेल्या ठिकाणची पाहणी केली आहे. त्याचबरोबर नुकसानग्रस्त शेतकर्यांना मदत मिळवून देण्याचे आश्वासन देखील त्यांनी दिले आहे.
धक्कादायक! बिबट्याने जागीच ठार केले शेतकऱ्याला; वाचा सविस्तर
वीजवाहक तारांना बऱ्याच ठिकाणी झोळ पडले आहेत तर काही ठिकाणी तारा हाताला देखील येत आहेत. यामुळे नुकसान टाळण्यासाठी महावितरणने लवकरात लवकर प्रयत्न करणे गरजेचे आहे.