पुणे : राज्याचे माजी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) त्यांच्या गाडीवर पुण्यात १० ते १२ जणांनी हल्ला केला. पुण्यातील कात्रज चौकामध्ये हा हल्ला झाल्याची घटना घडली आहे. हल्ला केला यावेळी ”गद्दार-गद्दार” अशी घोषणाबाजी देखील करण्यात आली. आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांची सभा संपल्यानंतर मदार तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांच्या घरी जात असताना हा हल्ला झाला. यामध्ये आता एकनाथ शिंदे गटातील आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर पुण्यात हल्ला झाल्यानंतर शिंदे गटातून प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.
या हल्ल्यानंतर आमदार शंभूराजे देसाई (ShambhuRaje Desai) यांनी प्रतिक्रिया दिली. ते माध्यमांशी बोलताना म्हणाले, “कायदा व सुव्यवस्था बिघडू नये म्हणून आम्ही शांत आहोत. पण आमची सहनशीलता संपली तर उद्रेक होऊ शकतो”.
पुढे शंभूराजे देसाई म्हणाले, “उदय सामंत यांच्या गाडीवरील हल्ला हा प्रकार हा खूप दुर्दैवी आहे. एकनाथ शिंदेंना मिळणारा प्रतिसाद त्यांना पाहवत नाही. आम्ही जनमाणसांतून पुढे आलो आहोत. आम्ही कायदा कधीही हातात घेतलेला नाही. आम्ही शांत आहोत. तशा सूचना एकनाथ शिंदे यांनी आम्हाला दिल्या आहेत. आम्हाला मिळणारा पाठिंबा त्यांना पाहवत नाहीये. त्यामुळे अशा प्रकारे गालबोट लावण्याचा प्रयत्न केला जात आहे”.
शिंदे गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर यांची प्रतिक्रिया –
या हल्ल्यानंतर शिंदे गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, ”हा प्रकार अत्यंत चुकीचा आहे. आक्रमक भाषणांमधून असे प्रकार घडत आहेत. आक्रमक भाषण करण्याचा उद्देश हाच आहे. त्यामुळेच शिवसैनिकांमध्ये रोष आहे. त्यासाठी आदित्य ठाकरेंची (Aditya Thackeray) यात्रा सुरू आहे.”